दिनांक 27 फेब्रुवारी 2025
एच. ए. स्कूल प्राथमिक विभागाचा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेने सांघिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्ताने पुणे किड्स स्टार्स , भारतीय लोक संस्कृती कला तर्फे आंतर शालेय सांघिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून खंडोबाचा खंडा....राजं आलं राजं आलं.....शिवरायांची आरती ....छाती केसरीची.... या चार गाण्यांमधून शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखविणारे नृत्य सादर करण्यात आले. या नृत्यासाठी समीक्षा इसवे, सीमा हांगे, सुप्रिया गावडे यांनी मार्गदर्शन केले. ज्योती निवांगुणे, ज्योती भोसले यांनी नेपथ्य तयार केले. प्रतिभा पोटघन, विवेक वाखुरे व मयुरेश हिरेमठ यांनी वेशभूषा व मेकअप साठी सहकार्य केले. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. श्री विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. नृत्य स्पर्धेत इयत्ता तिसरी-चौथीच्या ३४ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. नृत्य स्पर्धेसाठी वाघोली, आळंदी, खेड, लोहगाव, वडमुख वाडी अशा विविध भागातून ४५ शाळांचे स्पर्धक आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व मराठी चित्रपट निर्माते श्री मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शिक्षण सेवक समितीचे अध्यक्ष शिळीमकर यांनी अभिनंदन केले .
तसेच संस्थेचे, माननीय मुख्याध्यापकांचे, सर्व शिक्षकांचे, पालकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शब्दांकन
सौ शहनाझ हेब्बाळकर