गुरूवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रा. म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिर, कर्वेनगर येथे मराठीदिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनंदाताई देशमुख पार्वतीबाई अध्यापक विद्यालय तसेच आनंदीबाई प्राथमिक विद्यालययाच्या मुख्याध्यापिका यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये १ली ते ४थी च्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमामध्ये अभंग, भजन, ओवी, पोवाडे , गवळण , तसेच माय मराठी गीताचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शिक्षण विवेक आयोजित "सांगू का गोष्ट?" स्पर्धेतील विद्यार्थिनींचे पारितोषिक वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई वानखेडे यांनी केले. शिक्षक माहिती प्रियांका ताई हरिश्चंद्रे यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीताई झेंडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार गौरीताई काटकर यांनी मानले.
अशा प्रकारे मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साही वातावरणात संपूर्ण कार्यक्रम साजरा करण्यात आला.