एन. ई.एम.एस. शाळेमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा!

शिक्षण विवेक    28-Feb-2025
Total Views |


जागतिक मातृभाषा दिन

 

जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून अक्षर रसिक तर्फे शनिवार पेठेतील एन. ई.एम.एस. शाळेमध्ये दोन्ही सत्रांमधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हस्ताक्षर आणि शुद्धलेखन कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी श्री शैलेश जोशी हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. सरांनी विविध अक्षरांचे वळण, ऱ्हस्व- दीर्घ मात्रा हे प्रात्यक्षिकातून दाखवले तसेच जोडाक्षरांचे नियम, विविध शब्दांमध्ये दडलेले मराठी अर्थ इत्यादीचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख उपस्थित होत्या.