आजच्या कार्यक्रमास न.मु.म.पा. आरोग्य विभागाच्या नर्स सरिता पवार आणि पूजा इंगळे , पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापिका सुवर्षा सागवेकर,प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापिका ऋतुजा गवस,प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका तनुजा नायर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, व पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईचं औक्षण करून पूजन केले. आईचे आशीर्वाद घेतले..
अशा प्रकारे आपली संस्कृती जोपासण्याचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला.