'सर्जा-राजा'

शिक्षण विवेक    14-Feb-2025
Total Views |


सर्जा-राजा

 

'सर्जा-राजा'ची बैल जोडी

एकाच्या अंगी होती खोडी

 

कामाच्या वेळी बसायचा

लब्बाड आळशी रुसायचा

 

खायला खाई गट्टम चारा

'सर्जा' दिसे तरुण गोऱ्हा

 

'खायला काळ भुईला भार'

म्हणून बसे 'सर्जा'ला मार

 

मालक करी 'राजा'चे लाड

'सर्जा'ला शिव्या म्हणे द्वाड

 

'राजा'चे लाड वाढतच गेले

'सर्जा'ला पडले भलते कोडे

 

मालक करतो 'राजा'चे लाड

आपल्या नशिबी हाड हाड

 

कारण काय शोधलं त्यानं

'राजा'च्या अंगची हेरली गुणं

 

म्हणाला आळस झटकून टाकू

जुवा खाली पटकन वाकू

 

औत ओढायचं बसायचं नाय

ढोंग करून रुसायचं नाय

 

तेव्हापासून मालक फिदा

राजाला त्यांनी केला अलविदा

 

'सर्जा' गाळू लागताच घाम

मालकालाही पटलं काम

 

बैलांना दिलं मनभर प्रेम

'सर्जा-राजा'ची जोडी झाली फेम

 

भानुदास धोत्रे