रमणबाग शाळेत छंद गणेशोत्सवांतर्गत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचे पूजन
सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत ऋषिपंचमी निमित्त संस्कृत तज्ञ डॉ.श्रीकांत बहुलकर,
प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री.भा. काकडे,माजी शिक्षक डॉ.पुष्पाताई घळसासी,डॉ.गोविंद घळसासी व बाळासाहेब पानसे यांचे विद्यार्थ्यांनी पूजन व औक्षण केले. ऋषिपंचमी निमित्त ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या पूजनातून विद्यार्थ्यांसमोर आदर्श व्यक्तिमत्वांचे दर्शन घडतेअसे प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी सांगितले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.ॲड.अशोक पलांडे,प्रशालेचे वित्त नियंत्रक डॉ. विनयकुमार आचार्य,शाळा समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर यांच्या उपस्थितीत ऋषितुल्य व्यक्तींना मानपत्र प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस,भाषातज्ञ यास्मिन शेख आणि सु.ह.जोशी यांचा देखील घरी जाऊन सत्कार व पूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांनी विविध संकल्पनेवर आधारित गणेशावर लिहिलेल्या आशय आरती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय गणेशोत्सवासाठी पालखी भेट देणाऱ्या सर्वेश पवार या माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार यानिमित्ताने करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय दीप्ती डोळे,वर्षा गानू, रवींद्र सातपुते यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रतिभा जक्का यांनी केले तर शितल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षक अंजली गोरे ,मंजुषा शेलुकर हे या कार्यक्रमास उपस्थित होते. छंद गणेशोत्सवाचे अध्यक्ष शारदा जोशी उपाध्यक्ष अनघा काकतकर व संजय अहिरे त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.