शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले रमणबाग शाळेचे कामकाज

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले रमणबाग शाळेचे कामकाज

शिक्षण विवेक    05-Sep-2024
Total Views |


शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले रमणबाग शाळेचे कामकाज

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले रमणबाग शाळेचे कामकाज

दिनांक 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थी शिक्षकांनी शालेय कामकाज पाहिले. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिपायाच्या सर्व भूमिका पार पाडत शालेय परिपाठापासून वर्गात शिकवण्यापर्यंत प्रशालेचे सर्व दैनंदिन कामकाज दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाहिले. परिपाठाच्या वेळी विद्यार्थी शिक्षक ओम बोरकर यांनी शिक्षक दिनाची माहिती वर्ग वाणीवरून सांगितली.विद्यार्थी शिक्षकांनी छान शैक्षणिक साधने तयारी करुन,फलक लेखन करुन अभ्यासपूर्ण पाठ घेतले.आज विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून निखिल अंभग तर उपमुख्याध्यापक म्हणून नारायण कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

विद्यार्थी शिक्षकांनी वर्गात शिकवण्याचे अनुभव कथन केले. प्रशालेतील शिक्षक श्री. हेमंत पाठक, सौ.दीप्ती डोळे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठाचे निरीक्षण करुन त्यांचे कौतुक केले.

भाग्योदय उद्योग समूहाचे संचालक श्री.विकास सेठिया यांच्याकडून प्रशालेतील शिक्षक श्री महेश जोशी, श्रीमती शारदा जोशी श्रीमती ऋचा कुलकर्णी , श्री.राजेंद्र पवार यांना शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक श्री. जयंत टोले, पर्यवेक्षक श्रीमती अंजली गोरे, पर्यवेक्षक श्रीमती मंजुषा शेलूकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा जक्का यांनी केले तर ऋणनिर्देश अनघा काकतकर यांनी केले.