शिक्षण माझा वसा पुरस्कार २०२५ !!

शिक्षण माझा वसा पुरस्कार २०२५ !!

शिक्षण विवेक    28-Sep-2024
Total Views |

शिक्षण माझा वसा पुरस्कार २०२५ !!

उपक्रमशील शिक्षकांसाठी ‘शिक्षण माझा वसा’ युवा पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन....

 शिक्षणविवेक ही मागील १२ वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात कार्यकरणारी सकारात्मक चळवळ आहे. ही क्रियाशीलता अधिक वाढावी म्हणून अंक आणि स्पर्धा-उपक्रम यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने काम करत असताना आपल्यातल्या क्षमता ओळखत त्यातून विद्यार्थी केंद्री विचार करावा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे त्यांना अधिक उन्नत करावे यासाठी आपण मागील आठ वर्षांपासून उपक्रमशील युवा शिक्षकांना ‘शिक्षण माझा वसा' हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देत आहोत. शिक्षण माझा वसा २०२५ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारासाठी नामांकने मागवत आहोत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका महानगरपालिका आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी या पुरस्कारासाठी नामांकने पाठवावी ही विनंती.
पुरस्करासाठी विषय -
१) भाषा – मराठी/हिंदी/इंग्रजी
२) गणित
३) विज्ञान
४) कला-चित्र/नाट्य/शिल्प/संगीत
५) तंत्रज्ञान
६) उपक्रमशील मुख्याध्यापक
७) विशेष पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप :
सन्मानचिन्ह, मानपत्र व रू. ५०००/-
 
नामांकनासाठीचे नियम व निकष :
 
* नामांकन पाठविणाऱ्या शिक्षकाचे कमाल वय ४५ वर्षे असावे.
* जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे.
* मुख्याध्यापकांना पुरस्कारासाठी वयाची अट नाही.
* शाळा अनुदानप्राप्त असल्याचा दाखला आवश्यक आहे (खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी)
* किमान ३ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
* कला शिक्षकांसाठी शासन नियुक्ती अनिवार्य आहे.
* नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
* निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
 
पुरस्कार कसे पाठवावे :
 
* शिक्षकाचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष पुढील नियोजन.
* उपक्रमांसंबंधीची छायाचित्रे / व्हिडीओ
* वरील माहिती ‘शिक्षणविवेक’ १४५३-५४ सदाशिव पेठ, म.ए.सो. भावे पूर्व प्राथमिक शाळा, पुणे– ३० या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा shikshanmazavasa@gmail .com या मेल आयडीवर पाठवावी.
* किंवा सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी
 
 
या लिंकवर किल्क करावे.
 
अधिक माहितीसाठी ८४२१११८६३२, ७०४५७८१६८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.