गणपती बाप्पा मोरया Sssssमंगलमूर्ती मोरया Sssssssउंदीर मामा की जय Sssss

गणपती बाप्पा मोरया Sssss मंगलमूर्ती मोरया Sssssss उंदीर मामा की जय Sssss

शिक्षण विवेक    23-Sep-2024
Total Views |

गणपती बाप्पा मोरया Sssss मंगलमूर्ती मोरया Sssssss उंदीर मामा की जय Sssss
डी. ई.एस. प्रायमरी विभाग
टिळक रोड पुणे 30
गणपती बाप्पा मोरया Sssss
मंगलमूर्ती मोरया Sssssss
उंदीर मामा की जय Sssss
आतुरता बाप्पाच्या आगमनाची असे म्हणता म्हणता चार दिवस सरत गेले आणि सातवा दिवस -13 सप्टेंबर 2024उजाडला.
यावर्षी अखिल मंडई गणपतीने साकारलेल्या काल्पनिक शिवालयामध्ये डी. ई.एस.चे सर्व भक्त गण अवतरले होते.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला साकडे घालण्यासाठी.
सर्वांना निरोगी आरोग्य लाभू दे व सर्वजण सुदृढ होऊ देत. उद्याचा भारत घडवत असताना भावी पिढीतील प्रत्येक व्यक्ती सुदृढ व सशक्त असली पाहिजे. याच अनुषंगाने इयत्ता 3च्या दीडशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 12 सूर्यनमस्कार घालून सूर्यनारायणाला तब्बल 1800 सूर्यनमस्कारांची मानवंदना अर्पण केली. याप्रसंगी उभारलेल्या काल्पनिक शिवालय या देखाव्यामध्ये शंकर- पार्वती सह गजानन व शारदा हे देखील कैलास पर्वत सोडून या देवालयामध्ये अवतरले होते. मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी देवाचे औक्षण करून तर सूर्यनारायणाला अरघ्य देऊन पर्यवेक्षिका ग्रेसी डिसूजा यांनी स्वागत केले.
इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांनी लेझीम, बरची,झांज,ध्वज व ढोल- ताशा पथक यांची प्रात्यक्षिके सादर केली.
सादरीकरणात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान,नटखट कृष्ण,सुदामा,छत्रपती शिवराय,जिजाऊ, अशा भूमिका छोट्या विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. प्रात्यक्षिकाच्या द्वारे जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची धुरा सकाळ सत्र क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे यांनी लीलया पेलली.संगीत शिक्षिका हर्षदा कारेकर यांनी आभार प्रदर्शन केले. सायली मराठे, शितल बेलवटे,शुभ्रा भट, दर्शना मेश्राम,न्यानसी गवारे, अनघा पाटील, गिरीजा कदम, रुचिरा शिंदे या शिक्षिकांचे सहकार्य कार्यक्रमास मिळाले.
गणपती बाप्पाला पंचामृत, पंचखाद्य, पेढा, बर्फी,मोदक असा पंचपक्वान्नाचा प्रसाद श्रींना अर्पण केला.
ढोल ताशा पथकाची धुरा डी. ई.एस.च्या पालकांनी उत्तमरीत्या सांभाळली.
डी. ई. एस. शाळेचे पालक श्री व सौ संपगावकर यांनी शाळा व अखिल मंडई मंडळ यांच्यातील दुव्याचे काम उत्तमरीत्या सांभाळले व विद्यार्थ्यांचे भरपूर कौतुक केले.
डी.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. पलांडे यांनी गणरायाला तोरण बांधून क्रीडा क्षेत्रामध्ये हाती घेतलेला नवीन उपक्रम निर्विघ्नपणे पार पडावा असे शुभाशीर्वाद घेतले. क्रीडाध्यक्ष श्री व सौ खेमराज रणपिसे,श्री. मिलिंद कांबळे, श्री. अमरुळे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.मुख्याध्यापिका माधुरी बर्वे , विजया जोशी, लक्ष्मी मालपेटी , सिमरन गुजर यांनी हजेरी लावली. ग्रेसी डिसूजा यांच्या देखरेखेखाली माननीय मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.
योगिनी कानडे
क्रीडा शिक्षिका