डी.ई.एस. सेकंडरी स्कूलच्या
तेजोमय आंतरशालेय गटचर्चा,
टी-शर्ट पेंटिंग, प्रश्नमंजुषा स्पर्धा
पुणे: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, विचारांना दिशा, गती, बुद्धीला चालना आणि व्यासपीठ मिळावे या हेतूने डी.ई.एस.सेकंडरी स्कूल, टिळक रोड येथे दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी गटचर्चा, टी-शर्ट पेंटिंग आणि दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाला समिती अध्यक्षा राजश्री ठकार, प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, प्री प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, सरिता स्वादी, पालक संघाच्या उपाध्यक्षा अदिती जोशी आदी पुण्यातील विविध शाळेतील शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
तेजोमय स्पर्धेचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया जोशी यांनी केले. गटचर्चा स्पर्धेच्या सूचना व माहिती राधा केतकर यांनी दिली. गटचर्चा स्पर्धेत पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये ‘भारतीयांना सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य करायचे का ? तर अंतिम फेरीसाठी ‘भारतीय राजकारणाची पुनर्रचना करणे ही काळाची गरज आहे का ?असे विषय देण्यात आले होते . गटचर्चा स्पर्धेत प्रथम पारितोषिक आदि शंतनू भंडारे(डी.ई.एस.सेकंडरी स्कूल )द्वितीय निया निरंजन भुर्के ( ज्ञान प्रबोधिनी),तृतीय मिहिर मंगेश साबणे (डी.ई.एस.सेकंडरी स्कूल )यांना मिळाले. गटचर्चा स्पर्धेचे परीक्षण शिबू नायर, डॉ.दिशा राजाध्यक्ष,अपर्णा रानडे, रसिका दातार यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
टी-शर्ट पेंटिंग साठी गणेशोत्सव एका उद्देशाने, योग-जीवनाचा मार्ग, व्यंगचित्रे - स्ट्रेसबर्स्टर,भविष्यातील वाहने असे विषय देण्यात आले होते. कलाशिक्षक निखिल आचार्य यांनी टी-शर्ट पेंटिंग स्पर्धेचे नियम सांगितले.यात प्रथम पारितोषिक योगेश सागर वर्मा (हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कूल) द्वितीय सिमी तुषार कोठावडे (सिम्बायोसिस सेकंडरी स्कूल ) तृतीय कस्तुरी सचिन पारखे (भारतीय विद्या भवन स्कूल )तर उत्तेजनार्थ कानन हर्षद बाफना (सिम्बायोसिस माध्यमिक शाळा) यांना मिळाले.या स्पर्धेचे परीक्षण नागसेन जाधव यांनी केले. टी-शर्ट पेंटिंग स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अर्णव सूर्यवंशी, ओजस आवटे, अनिश भिरूड( सिम्बॉयसिस स्कूल ) द्वितीय पारितोषिक आदित्य रघु , ईशान सोनार, राम दामले
( सिम्बॉयसिस स्कूल ) या विद्यार्थ्यांना मिळाले. विविध क्षेत्रातील प्रश्न विचारून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे अनुराग गंग्रस याने सूत्र सांभाळले तर ईशान मेहेंदळे, ऋचा मोहरीर यांनी सहकार्य केले.विजया जोशी, लक्ष्मी मालेपाटी, सरिता स्वादी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन नेहा देशपांडे, कौस्तुभ कानडे, विभावरी तोरो, अनघा जोध, ईशा लिखिते यांनी केले. राधा केतकर, सरिता स्वादी यांनी आभार मानले. तेजोमय आंतरशालेय स्पर्धेमध्ये पुण्यातील अनेक शाळांचा सहभाग होता.स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. वंदे मातरम् ने स्पर्धेची सांगता करण्यात आली.पल्लवी धिवार, सायली सोमण, कांचन सोलापूरकर यांनी गायन केले.मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.
बातमीलेखन :
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक,डी.ई.एस. सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग,पुणे ३०