म. ए. सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे शिक्षणविवेक वर्धापनदिन अंक प्रकाशन २०२४

शिक्षण विवेक    09-Aug-2024
Total Views |


वर्धापनदिन अंक प्रकाशन  

आज दिनांक ९ ऑगस्ट २०२४ क्रांती दिन या दिवशी म. ए. सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता.मुळशी, जि. पुणे येथे "शिक्षणविवेक ऑगस्ट २०२४" या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग तसेच प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शिक्षण विवेक प्रतिनिधी श्री. सचिन जाधव यांनी अंकाविषयी माहिती दिली व सर्वांचे आभार मानले.