डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, शनिवार पेठ शाळेतीलमुलांनी दिली केसरी वाड्याला भेट

शिक्षण विवेक    05-Aug-2024
Total Views |

 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, शनिवार पेठ  शाळेतील मुलांनी दिली केसरी वाड्याला भेट

दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी, लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, शनिवार पेठ मधील सकाळ व दुपार विभागाच्या इयत्ता तिसरी, चौथीच्या मुलांनी केसरी वाड्याला भेट दिली. टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कार्याची मुलांना जाणीव व्हावी व त्यांच्या मनात देशाभिमान जागृत व्हावा, हा यामागे हेतू होता.
कार्यक्रमांतर्गत लोकमान्य टिळक यांच्या काही प्रसिद्ध घोषवाक्य लेखनाचा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका सौ. मनीषा पेठकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. तसेच काही विद्यार्थ्यांनी बाळ गंगाधर टिळकांबद्दल माहिती सांगून टिळकांवर आधारित पोवाडा आणि गोष्टी यांचे सादरीकरण केले. इयत्ता १ली व 2 री च्या विद्यार्थ्यांनी देखील यात उत्साहाने भाग घेतला. संपूर्ण कार्यक्रम एन एम एस शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.