'राष्ट्रीय समूह गान'स्पर्धेत एस् पी एम् च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

शिक्षण विवेक    05-Aug-2024
Total Views |

 
'राष्ट्रीय समूह गान'स्पर्धेत एस् पी एम् च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

शनिवार ,०३ ऑगस्ट २०२४, रोजी भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित 'राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ' ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे' येथे संपन्न झाली .

या स्पर्धेत 'शिक्षण प्रसारक मंडळींचे एस्.पी.एम्. इंग्लिश स्कूल, माध्यमिक विभाग, पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

`

ही स्पर्धा संस्कृत आणि हिंदी या दोन्ही भाषेतील गीत गायनाची होती.हिंदी राष्ट्रीय समूहगान' स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि 'संस्कृत राष्ट्रीय समूहगान'स्पर्धेत द्वितीय क्रमांक विद्यार्थ्यां--मल्हार पटवर्धन

मधूश्री पेठे

सावनी चिरपूरटकर

अन्वीका करंदीकर

कस्तुरी कुलकर्णी

निकिता गोखले

ईरा गोखले

आदित जोशी यांच्या गटाने पटकावला.

हिंदी आणि संस्कृत भाषेतील 'राष्ट्रीय समूहगान स्पर्धेच्या ' एकत्रित श्रेणीत शाळा स्तरावर एसपीएम शाळा प्रथम क्रमांक पटकावून करंडकाची मानकरी ठरली आहे.

या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रमा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या संगीत शिक्षिका सौ प्रार्थना साठे आणि तबला शिक्षक श्री. अवधूत धायगुडे यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली.