गणपती कार्यशाळा...

शिक्षण विवेक    31-Aug-2024
Total Views |


गणपती कार्यशाळा... 

 श्रावण महिन्यात सणांच्या रेलचेल असतानाच ओढ लागते ती भाद्रपद महिन्याची आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आतुरता असते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची सगळीकडे मंगलमय वातावरण.... उत्साहात केली जाणारी तयारी .... वेगवेगळ्या रूपातील गणपती बाप्पांच्या मूर्ती बघून एका मातीच्या गोळ्यापासून असताना गणपती बाप्पाची मूर्ती कशी तयार होत असेल बर? हा प्रश्न या लहान मुलांना पडला नसेल तरच नवल ... म्हणूनच बाप्पा कसा तयार होतो त्याचे प्रात्यक्षिक मोठ्या गटातील मुलांना शाळेत शाडू मातीपासून गणपती बनवून दाखविण्यात आले. मा. मुख्याध्यापिका अमिता ताई यांच्याबरोबरच गणपती बनवण्यासाठी शाळेतील माजी शिक्षिका श्रद्धा ताई खोले यांना आमंत्रित करण्यात आले होते. गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष तर म्हटलेच पण बरोबरीने बाप्पांची गोड गाणी म्हणत तसेच गणपती बाप्पांचा जयघोष करत मूर्ती साकार होताना बघण्याचा आनंद सर्वांनी घेतला.