पाऊसपंचम

शिक्षण विवेक    28-Aug-2024
Total Views |


पाऊसपंचम 

 लहान मुलांना एखादी संकल्पना चित्रातून, प्रनिकृतीतून पटकन समजणे मुलांना जलचक्र व त्यावर आधारित नैसर्गिक गोष्टी मुलांना पटकन समजतील या हेतूने शाळेत

पाऊसपंचम हे अनोखे प्रदर्शन मांडण्यात आले. डे.ए.सो.च्या न्या. रानडे बालक मंदिरात शाळेच्या हॉलमध्ये मांडण्यात आले.

ह्या प्रदर्शनात डोंगराच्या प्रतिकृतीपासून सुरुवान होऊन धरण, शेती, शेतीची अवजारे, शेतीला उपयुक्त जनावरे, गांडूळखत, ओल्या सुक्या कचऱ्याचे विभाजन, समुद्र, समुद्रातील संपत्ती, मिटागरे या सगळ्या गोष्टींच्या प्रतिकृती आकर्षकरित्या मांडण्यात आल्या.

शाळेतील मुले आपल्या पालकांसोबत हे प्रदर्शन अगदी कुतूहलाने बघत होती.

काही मुलांच्या व काही पालकांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता दाने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजन केले.