सोमवार दि.२६ऑगस्ट २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी 'सुविचारची हंडी'फोडून सुविचारांची लयलूट केली.यासाठी प्रत्येक वर्गातून सुविचार जमा करण्यात आलेले एकूण ३६० सुविचार हंडी मध्ये ठेवले होते.
बाळकृष्णाप्रमाणे संस्कारांचे बाळकडू घेऊन षडरीपुंवर विजय मिळवण्यासाठी सक्षम होण्याचा निर्धार करावा असा संदेश प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.चारुता प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना दिला. शालासमिती अध्यक्ष मा.डॉ.शरद
अगरखेडकर आणि शालेय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण व संतश्रेष्ठ ज्ञानदेव यांच्या प्रतिमांचे पूजन जन्मोत्सवानिमित्त पुष्पमाला घालून करण्यात आले.दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेतील नाट्यछंद वर्गातील विद्यार्थ्यांनी रवींद्र सातपुते सरांच्या मार्गदर्शनाखाली 'श्रीकृष्ण लीला 'नाटिकेचे सादरीकरण केले.ढोल ताशांच्या गजरात थर रचत हंडी फोडण्याचा आनंद पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी लुटला. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार दिनविशेष विभाग प्रमुख श्रीमती शुभांगी पाखरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले.उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षकअंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले.