डी.ई.एस.शाळेत १२ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शिक्षणविवेक मासिकाचे’ प्रकाशन

शिक्षण विवेक    10-Aug-2024
Total Views |


वर्धापनदिन अंक प्रकाशन  

डी.ई.एस.शाळेत १२ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शिक्षणविवेक मासिकाचे’ प्रकाशन
पुणे : आज दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी डी.ई.एस. प्रायमरी आणि सेकंडरी शाळेत क्रांती दिन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन आणि क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात तरुण यशवंतांचा सत्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये शिक्षण विवेकच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षणविवेक मासिकाच्या ( प्राथमिक व माध्यमिक) ऑगस्ट अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे मानसोपचारतज्ज्ञ मयुरेश डंके, डी.ई.एस.प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, प्री प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यशवंत, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते. शिक्षणविवेकच्या कार्याची माहिती राघवेंद्र गणेशपुरे यांनी दिली.