World Exploration day and National moon day निमित्त, डि.ई.एस मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत, चंद्राच्या कला, सूर्यमाला, यांच्या प्रतिकृती तयार करून लावण्यात आल्या. यावेळी मोठ्या गटातील एक मुलगा अंतराळवीर बनून आला होता. मुलांनी अतिशय उत्साहात सूर्यमाला, अंतराळ याबद्दल माहिती जाणून घेतली.
शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .या कार्यक्रमाचे सादरीकरण व डेकोरेशन शाळेच्या शिक्षिका अश्विनी टिपरे अश्विनी ठिगळे व रती काळभोर यांनी केले.