'श्री शिवसाम्राज्याभिषेक दिन'

शिक्षण विवेक    08-Jul-2024
Total Views |


'श्री शिवसाम्राज्याभिषेक दिन'

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, प्रशालेत शनिवार दि.६ जुलै २०२४ रोजी बहुआयामी तासिकेला शिवसाम्राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने झाली. त्याचवेळी प्रशालेतील विद्यार्थी तनय नाझीरकर व अमोघ कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे गायन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. चारुता प्रभुदेसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रसिद्ध शिवव्याख्याते व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. प्रसाद मोरे यांचा परिचय श्रीम.सुवर्णा केदारी यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रशालेतील विद्यार्थी श्रीपाद लुल्ला व त्याच्या वर्गमित्रांनी आवेशपूर्ण रितीने संबळवादन करून शिवाजीमहाराजांचा पोवाडा सादर केला.तसेच शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. श्रीम. अर्चना देवळणकर यांनी शिववंदना सादर केली.

या कार्यक्रमासाठी लाभलेले व्याख्याते श्री. प्रसाद मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या

कारकिर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांचे वर्णन केले. शिवराज्याभिषेक करण्यामागे असलेली भूमिका, उद्देश व तयारी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या कार्यक्रमाला मोतीबाग नगर कार्यवाह श्री. प्रमोद रामचंद्र वसगडेकर, कसबा भाग कार्यवाह

श्री. राहुल रत्नाकर पुंडे,आश्विन देवळणकर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक श्री.जयंत टोले सर, पर्यवेक्षक श्रीम.अंजली गोरे व मंजुषा शेलूकर उपस्थित होते.

बहुआयामी विभागप्रमुख श्री.रवींद्र सातपुते यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. श्री.हेमंत पाठक यांनी आभार मानले. श्रीम. अर्चना देवळणकर यांनी सूत्रसंचालन केले.