एच.ए. स्कूल प्राथमिक विभागामध्ये आज अवतरले विठ्ठल रखुमाई !!

शिक्षण विवेक    06-Jul-2024
Total Views |

एच.ए. स्कूल प्राथमिक विभागामध्ये आज अवतरले विठ्ठल रखुमाई !! 
 
दिनांक ६ जुलै २०२४

एच.ए. स्कूल प्राथमिक विभागामध्ये आज अवतरले विठ्ठल रखुमाई !!

डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेमध्ये आज पालखीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या , संतांच्या पोशाखात आले होते. मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.... तर मुलांनी टाळ , मृदंग , भगवी पताका हातात घेतली होती. स्वानंदी सोंडकर रुक्मिणी तर उत्कर्ष बुटकर विठ्ठलाच्या वेशभूषेत आले होते.

सर्वप्रथम मा. मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन व विठ्ठलाची आरती करण्यात आली . समीक्षा इसवे यांनी सूत्रसंचालन केले , शहनाझ हेब्बाळकर यांनी मुलांना गोष्टी रूपात पालखीची माहिती सांगितली. यानंतर शाळेचे बाल वारकरी विठू नामाचा गजर करत , अभंग म्हणत एच. ए. कॉलनी मधील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांच्यासोबत आमच्या बाल विठ्ठल रखुमाई ने सुद्धा मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतले व यंदा भरपूर पाऊस पडू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. अरुंधती लवळे या विद्यार्थिनीने अभंग गायला.

यावेळी समीक्षा इसवे , अनघा कडू , नीता चौधरी , शहनाझ हेब्बाळकर , डॉ.विठ्ठल मोरे , सुप्रिया गावडे यांनी भजन, अभंग गाऊन वारकऱ्यांना साथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांना केळी व चिवडा असा प्रसाद देण्यात आला.

शब्दांकन

सौ. शहनाझ हेब्बाळकर