रमणबाग शाळेत कारगिल विजय दिनानिमित्त व्याख्यान

शिक्षण विवेक    27-Jul-2024
Total Views |


रमणबाग शाळेत कारगिल विजय दिनानिमित्त व्याख्यान 

रमणबाग शाळेत कारगिल विजय दिनानिमित्त व्याख्यान

शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी बहुआयामी तासिकेत प्रशालेचे माजी विद्यार्थी सार्थक राहुरकर यांचे कारगिल युद्ध स्मरणकथा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.कारगिल युद्धाच्या कथा प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देणाऱ्या आहेत.राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी युद्धच करायला हवे असे नाही तर एखाद्या क्षेत्रात प्रगती करून राष्ट्राला न्याय व सन्मान मिळवून देणे म्हणजे सुद्धा देशसेवा होय असे मार्गदर्शन त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.चारुता प्रभूदेसाई यांनी अतिथींचे स्वागत केले कार्यक्रमास मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व परिचय शुभांगी पाखरे यांनी केला तर पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका अंजली गोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.