'या रे या सारे या.. खाऊ-खेळू मजा करूया..'

शिक्षण विवेक    27-Jun-2024
Total Views |


'या रे या सारे या.. खाऊ-खेळू मजा करूया..'

या रे या सारे या.. खाऊ-खेळू मजा करूया..' असे म्हणत खोलेश्र्वर प्रगती वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी लुटला मनमुराद आनंद

आज दि.१५ जून २०२४

श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभागामध्ये 'प्रवेशोत्सव - २०२४' हा कार्यक्रम बालवाडी ते चौथीच्या मुलांसाठी घेण्यात आला.

सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीचा खाऊ म्हणजेच भेळ व कॉटन कँडी. भेळ म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आणि तोच खाण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे घेतला.

२०२४-२५ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी रविवार पेठ केंद्राचे प्रमुख मा.श्री.कमलाकर कापसे सर, प्राथमिक विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष मा.श्री.उन्मेषजी मातेकर सर, मा.मुख्याध्यापक श्री.आप्पाराव यादव सर, विभाग प्रमुख मा.सौ.वर्षाताई मुंडे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच अहिल्यादेवींच्या प्रदर्शनीचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर इयत्ता बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. वर्गश: विद्यार्थ्यांचे मनोरंजक खेळ घेण्यात आले.

प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचेही अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत उपस्थित होते. कोणी अहिल्यादेवी, कोणी बाबासाहेब आंबेडकर, कोणी क्रांतिकारक तर कोणी वारकरी अशी वेशभूषा केली होती.

विद्यार्थ्यांबरोबरच केंद्र विभागातील व प्रगती विभागातील सर्व शिक्षकांनीही खाऊचा आनंद घेतला.

अशाप्रकारे शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेशोत्सव व शाळेच्या पहिल्या दिवसाचा मनमुरादपणे आनंद लुटला.