निरोप घेताना.....
कदाचित,
उद्या सोबत आपण नसू
पण आठवणीत नक्कीच असू
एकमेकांच्या....
कदाचित,
दूर असु आपण ध्येयप्राप्तीसाठी
पण मनाने जवळ असू
एकमेकांच्या.....
कदाचित,
विसरण्याचा प्रयत्न करावा लागेल
एकमेकांना,
पण नाही विसरू शकणार आपण,
गमती-जंमती,शाळेतल्या....
कदाचित,
दुसर्या कोणाच्यातरी,
हात हाती द्यावा लागेल
दुसर्या कोणातरी,
सोबत राहावं लागेल
पण ह्यातील तुम्ही अन् तुमच्या आठवणी,
नाही विसरू शकणार मी....
शाळा जरी सोडून गेलो तरी,
मिळत राहायचं बरकां
मोबाईल वरून का होईना पण,
बोलत राहायचं बरकां....
प्रज्वल साळवे
१०वी ’ ई ’
श्री सिद्धेश्वर मा.विद्यालय, माजलगाव.