डी.ई.एस.सेकंडरी स्कूल मध्ये दगडांचे निरीक्षण, संकलन

शिक्षण विवेक    06-Dec-2024
Total Views |


डी.ई.एस.सेकंडरी स्कूल मध्ये  दगडांचे  निरीक्षण, संकलन  

 डी.ई.एस.सेकंडरी स्कूल मध्ये दगडांचे निरीक्षण, संकलन

पुणे येथील टिळक मार्ग येथे आज दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या डी. ई. एस.सेकंडरी स्कूलच्या मैदान परिसरामध्ये वनराई उपक्रमांतर्गत दगड निरीक्षण, संकलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांकडून मैदान परिसरात असलेल्या विविध दगडांचे संकलन करण्यात आले. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडांचे संकलन प्रयोगशाळेत ठेवण्यात आले. दगड किती वजनाचा असेल याचा अंदाज घेतला. दगडांचे वेगळे रंग लक्षात घेतले. त्यांचे निरीक्षण केले. यापूर्वी प्रयोगशाळेत संकलन केलेल्या दगडांचे सुद्धा विद्यार्थ्यांनी या वेळी निरीक्षण केले. शिवाय दगड किती वजनाचा आहे. प्रयोग शाळेतील वजन काट्यामध्ये प्रत्यक्ष बघितले.वनराईच्या या उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी यांनी कौतुक केले.

वनराईचे शाळेतील प्रतिनिधी राघवेंद्र गणेशपुरे यांनी विद्यार्थ्यांना दगड निरीक्षण व संकलनाबद्दल माहिती दिली. शिक्षिका नेहा देशपांडे, सुप्रिया शेट्टी, विभावरी तोरो यांचे सहकार्य लाभले.