प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा स्वागत परिचय करून देण्यात आला. नाट्यछटा याविषयीचे नियम व माहिती श्रीमती लाहोरकर मॅडम यांनी सांगितले त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली इयत्ता तिसरी चौथी च्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे नाट्यछटा सादरीकरण केली. माननीय मुख्याध्यापिका श्रीमती भारती मॅडम यांनी नाट्यछटा म्हणजे काय आणि नाट्यछटा कशी सादर करावी याविषयी माहिती सांगितली. त्यानंतर नाट्यछटा स्पर्धेमध्ये प्रथम पाच विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्री रतन गिरी सर यांनी बक्षीस म्हणून पेन दिले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती फासे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. पसायदान माननीय मुख्याध्यापिका श्रीमती भारती मॅडम यांनी म्हटले.