'रोड सेफ्टी' विषयावर व्याखान

"रोड सेफ्टी" विषयावर व्याखान

शिक्षण विवेक    11-Dec-2024
Total Views |


'रोड सेफ्टी' विविषयावर व्याख्यान 

आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी म ए सो मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत रोड सेफ्टी या विषयावर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. सदर व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून माननीय अनिल पंतोजी सर रिटायर्ड RTO इन्स्पेक्टर लाभलेले होते.

सरांनी अतिशय बहुमोल मार्गदर्शन करत वाहतुकीचे नियम, वाहतुकीची चिन्हे, हेल्मेटचा योग्य वापर कसा करावा, पादचारी म्हणून रस्त्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, यासंबंधीची माहिती खूप प्रभावी पद्धतीने व्याख्यान तसेच PPT च्या माध्यमातून समजावून सांगितली.

याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री वसावे सर सर्व ज्युनिअर कॉलेज शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.