26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा

26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा

शिक्षण विवेक    26-Nov-2024
Total Views |
 
संविधानदिन साजरा
 

म.ए.सो. मुलांच्या विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्तिकी एकादशीनिमित्त प्रशालेला सुट्टी असल्याने संविधान दिन गुगल मीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक वसावे सर, एन. सी. सी.च्या शिक्षिका शिंदे मॅडम, खुणे सर व एन. सी. सी. छात्र यांनी प्रशालेत जाऊन हा दिवस साजरा केला. तसेच २६ नोव्हेंबर २०११ मध्ये मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. मुख्याध्यापक वसावे सर एन.सी.सी.च्या शिक्षिका शिंदे मॅडम, एन.सी.सी. छात्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गवळे सर यांनी केले. त्यात त्यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. संविधानातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्वसंविधान पूर्ण करण्याचा कालावधीदेखील सांगण्यात आला.

त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन चौधरी मॅडम यांनी केले. त्यांच्या मागून सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी संविधान म्हटले. संविधानाच्या प्रत्येक ओळीचा अर्थ; तसेच सार्वभौमसमाजवादी, धर्मनिरपेक्षलोकशाही, प्रजासत्ताकन्यायस्वातंत्र्य, समानता व बंधुता या शब्दांचे स्पष्टीकरण सहज सोप्या व सर्वांना कळेल अशा भाषेत केले. प्रशालेच्या पर्यवेक्षिका लिमये मॅडम यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. या संविधान दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.