मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याप्रति विद्यार्थ्यानी आनंदोत्सव साजरा केला
साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील, एन.ई.एम.एस शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी च्या सुमारे ५०० विद्यार्थ्यानी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याप्रति आनंद व्यक्त करत मराठी भाषा अभिमान गीत सादर केले.राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी शाळेत दहा फुटाची मराठी अक्षर असलेली भव्य रांगोळी रेखाटली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळीच्या भोवताली गोल उभे राहून मुलांनी मराठी भाषा संवर्धनाचा निश्चय करत मराठी माणसाशी मराठी भाषेतच बोलावे अशी शपथ घेतली. संगीत शिक्षिका अश्विनी पटवर्धन तसेच श्रध्दा रांजेकर यांनी सुरेल मराठी अभिमान गीत गायले, याप्रसंगी शाळेतील दुपार विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शुभम पळसकर,अतुल निकम, गंधरी शहा, नरेंद्र व्यास इत्यादी मान्यवर उपस्थित होते .पियूष शाह यांनी अभिजात दर्जा याचे महत्व सांगत प्रास्तविक व आभार मानले.