निरांजनाच्या ज्योती उजळून आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे वाढदिवस डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये या नवीन शैक्षणिक वर्षापासून साजरे केले जात आहेत.

निरांजनाच्या ज्योती उजळून आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे वाढदिवस डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये या नवीन शैक्षणिक वर्षापासून साजरे केले जात आहेत.

शिक्षण विवेक    19-Oct-2024
Total Views |
 
निरांजनाच्या ज्योती उजळून आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे वाढदिवस
निरांजनाच्या ज्योती उजळून आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे वाढदिवस डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये या नवीन शैक्षणिक वर्षापासून साजरे केले जात आहेत.
आपली संस्कृती, वंश परंपरेनुसार चालत आलेल्या रूढी व परंपरा यांची आजच्या पिढीला माहिती मिळावी व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या दृष्टिकोनातून यावर्षीपासून विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेतच साजरा करण्याचा उपक्रम या चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केला आहे.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस मागच्या महिन्यात आले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना त्या त्या वर्गातील वर्गशिक्षिका त्यांचे औक्षण करून व त्यांच्या गुरुजनांचा आणि पालकांचे आशीर्वाद घेऊन ही संकल्पना राबवली जात आहे.
भारतीय पद्धतीत (हिंदु संस्कृतीत) जिचा वाढदिवस आहे, त्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, अशा पद्धतीने तो साजरा करायला सांगितला आहे. त्या व्यक्तीचे औक्षण करायला आणि तिला देवाला अन् वडीलधार्‍या माणसांना नमस्कार करायला सांगितले आहे. तसे केल्याने देवाचा आणि वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभतो अन् चैतन्य ग्रहण होते.
केकवर पेटवलेल्या मेणबत्त्या विझवतांना फुंकरीतून कित्येक लक्ष जिवाणू केकमध्ये येऊन मुलांना जिवाणूंची बाधा होऊ शकते तसेच शिजवलेल्या अन्नाला धारदार शस्त्र म्हणजेच सूरी लावली तर अन्नाचा ऱ्हास होतो, त्यापेक्षा कपाळावर टिळा लावल्यानंतर तांदूळ (अक्षत) लावणे. तांदूळ हे शुद्ध धान्य आहे. त्यामुळेच तांदळाला अक्षता असेही म्हणतात. अक्षता म्हणजे जे कधीही नष्ट होणार नाही असे… यामुळे कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. याच कराणामुळे टिळा लावल्यानंतर तांदळाचा वापर केला जातो. त्यासोबतच हिंदू धर्मात भात हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याचा वापर केला जातो.
या गोष्टी मुलांना समजाव्यात म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.