आदिशक्ती महोत्सव २०२४ -२५
शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे 'आदिशक्तीचा जागर' या उत्सवाच्या निमित्ताने व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्री जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध कलागुण व
कौशल्यांना वाव मिळावा, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षकांमध्ये रुजावे व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिशक्ती ...जागर स्त्रीशक्तीचा ' हा महोत्सव रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर ,कल्याण या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास कोकण प्रांत कार्यकारणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. श्री सुनीलजी सप्रे सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. न्याय, सद्भावना, समरसता निर्माण करण्याचे खूप मोठे काम शिक्षक करतात. मी कडून आम्ही कडे जाण्याचा जगण्याचा प्रवास असावा. समाज ,देश, विश्व अशी जीवनदृष्टी असावी. विद्यार्थ्याला घडवताना योग्य अयोग्य मधील फरक पटवून देणे व योग्य संस्कार करणे, समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . मुरुड जंजिरा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी मा. दिपाली दिवेकर मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास लाभल्या. आजच्या विषयाला अनुसरून त्यांनी आपल्या मनोगतातून माती ही मूळ आदिशक्ती असून मातीशी इमान आणि मातीचा मान हा राखला पाहिजे. निसर्गाच्या हाके कडे लक्ष द्या. विधायक कामासाठी शिक्षक शक्तीचा जागर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. श्रीकांतजी तरटे सर यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकिशोरजी जोशी सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात संस्था 64 वर्षात पदार्पण करत असल्याचा आनंद व्यक्त केला. उत्कृष्टतेचा ध्यास असणारे ,ज्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने संस्था उत्तम कामगिरी बजावत आहे असे संस्थेचे सरचिटणीस मा. डॉ..निलेशजी रेवगडे सरांचे विशेष कौतुक केले.
छत्रपती शिक्षण मंडळ NEP समन्वयक व सदर कार्यक्रमाच्या प्रमुख सौ. उर्मिला जाधव मॅडम यांनी NEP विषयी विस्तृत प्रास्ताविक केले व संस्थेमार्फत राबवले जाणारे गुणवत्ता विकास उपक्रम, शाळा मूल्यांकन या संदर्भात सभागृहाला उदबोधित केले.
याप्रसंगी वनवासी क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या मा. श्रीमती ठमाताई पवार यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
संस्थेसाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे 'माझी शाळा सुंदर शाळा * या अभियानांतर्गत आपल्या संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील *माध्यमिक विद्यालय तलासरी या शाळेला प्रथम क्रमांक, तर रायगड जिल्ह्यातील अभिनव विद्यामंदिर उसर खुर्द शाळेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, तर जय जवान जय किसान वाघेरी या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. तसेच पडघा सीनियर कॉलेजला NAAC चे मानांकन प्राप्त झाले आहे.या शाळांचा व महाविद्यालयाचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
शालेय परिसर, शालेय व्यवस्थापन,भौतिक सुविधा,शाळा व समाज,क्रीडा विभाग, गुणवत्ता विकास हे मुद्दे लक्षात घेऊन शाळा मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार सर्वोत्तम शाळा संकुलाचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच साहित्य, पर्यावरण व विज्ञान या क्षेत्रामध्ये संस्था विशेष कामगिरी बजावत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शाळांना पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत येणारी आव्हाने व त्या आव्हानांचा सामना करत असताना बदललेली अध्यापन पद्धती अधिक प्रभावी व्हावी यासाठी शिक्षकांसाठी सांघिक सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रभावी अध्यापनाचे सादरीकरण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सर्वोत्तम सादरीकरण करणाऱ्या शाळांना बक्षीस देऊन गौरविण्यात करण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून मा. श्री. विश्वास जी सोनवणे सर, सौ. मनीषा वाजे, सौ. योजना चौधरी व डॉ. निलेश जी रेवगडे सर यांनी उत्कृष्ट कार्यक्रमांची निवड केली.
सदर कार्यक्रमाला छत्रपती शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, माजी सभासद,माजी मुख्याध्यापक, समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकिशोर जोशी सर, संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा. श्री.श्रीकांत जी तरटे सर, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. विश्वास जी सोनवणे सर, संस्थेचे सरचिटणीस मा.डॉ.निलेशजी रेवगडे सर,संस्था कार्यकारिणी सदस्य मा. श्री. मिलिंद कुलकर्णी सर, कार्यक्रम प्रमुख मा. सौ. उर्मिला जाधव मॅडम या सर्वांच्या अथक मेहनतीने आदिशक्ती -जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने झाली