शिक्षण
परवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो? खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ..