विशेष

संगीतातील देवत्त्व

यशवंत त्र्यंबक देव यांचा जन्म पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे वडील त्र्यंबक गोविंद देव हे संगीतप्रेमी होते. ते स्वतः अनेक वाद्ये उत्तमरीत्या वाजवत. यशवंत देवांचे शालेय शिक्षण प्रथम पेण खाजगी विद्यालय येथे व त्यानंतर नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव, नूतन मराठी विद्यालय, पुणे आणि चिकित्सक समूह विद्यालय, गिरगाव, मुंबई अशा विविध शिक्षणसंस्थांमध्ये झाले...

नकुशी

अधिकार, हक्क मिळण्यासाठी तिने जन्म घेण्याची गरज असते; पण आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये मुलीला जन्माला येण्याचा अधिकारच हिरावून घेतला जातो. स्त्रीभ्रूण हत्येवर कायद्याने बंदी असूनही अनेक छुप्या पद्धतीने मुलीला जन्माला घालण्यावर निर्बंध घातले जातात. ..

शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर

विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील पार्ले टिळक विद्यालयात झाले. संस्कृत विषयात बी.ए. केल्यानंतर त्यांनी एम.ए.एम.एड. या पदव्या घेतल्या. १९४८ मध्ये ते खार येथील विद्यामंदिर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे १९५६ मध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग जवळील पोयनाड येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले...

विश्‍वबंधुत्वाचा संदेश

‘‘माझ्या बंधुनो आणि माझ्या भगिनीनो...’’ 11 सप्टेंबर 1893 हा सर्वच धर्मातील लोकांसाठी सानेरी दिवस होता. याच दिवशी स्वामीजींनी विश्‍वबंधुत्वाचा संदेश जगासमोर मांडला. जगाला हिंदू धर्माची ओळख नव्याने करून दिली. सध्याचे वर्ष हे भाषणाचे एकशे पंचवीसावे वर्ष आहे. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय...

बालकवितेतील विंदा

‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ असं म्हणतात ते अगदी खरं आहे. भौतिकदृष्ट्या अस्तित्वात असणार्‍या, दिसणार्‍या सर्व गोष्टी सूर्यदेव आपल्याला दाखवतात, पण त्या पलीकडचे काल्पनिक किंवा कल्पनातीत (कल्पनेपलीकडचे) जग पाहाते कवीचे संवेदनशील मन. ..

अभिवादन भारतमातेला..!

भारताचा – आपल्या देशाचा – स्वातंत्र्यदिन! ...आपल्या काही मित्रांना तो सुट्टीचा दिवस वाटतो. काहीजण त्याला जोडून रजा काढतात. “छानपैकी सहलीला जाऊ या” असे म्हणत मौज-मजा, रंजन-मनोरंजन यांचे बेत आखतात. ठीक आहे का ते ? नाही ! अजिबात नाही ! का बरे ?..

बालकवी

बालकवी - त्र्यबंक बापूजी ठोंबरे हे निसर्गकवी म्हणून सर्वांना परिचित आहेत.डॉ. कान्होबा रणछोडदास किर्तीकरांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या कवी संमेलनात ठोंबरे यांना ‘बालकवी’ ही पदवी प्राप्तझाली. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले होते. ..

गोष्ट एका विक्रमाची

मुलाची हुशारी लक्षात आल्यावर वडिलांनी त्याला ब्रिटनला ब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर बंगलोर येथे सी.व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वैश्‍विक किरणे’ यावर संशोधन केले. ब्रिटनहून डॉक्टरेट पदवी मिळवल्यावर आपल्या मायभूमीची सेवा करण्याचे ठरवले. ..

बालपण - विश्वकवीचे

तुम्हाला वाटेल, रवींद्रनाथांचे बालपण अगदी सुखात, आनंदात, लाडाकोडात गेले असेल ! पण तसे नव्हते, मित्रांनो, बालपणाबद्दल रवींद्रनाथ लिहितात --"आमच्या लहानपणी चैन वगैरे करण्याची पद्धत नव्हती. त्या काळचं आयुष्य फार साधंसुधं होतं. लहान मुलांकडे लक्ष द्यायचा प्रकार तर अजिबातच नव्हता. मुलांना सतत खायला-प्यायला घालून आणि कपडेलत्ते घालून, नटवून ठेवण्याची पद्धत नव्हती. आम्ही मुलं नोकरांच्या हुकमाखाली राहायचो. स्वतःचं काम सोपं व्हावं म्हणून नोकरांनी आमच्यावर कडक निर्बंध घातले होते. पण आमची मनं मुक्त होती आणि दडपणाखाली ..

वारी - वारसा संत परंपरेचा

जीवनातील सर्वश्रेष्ठ सेवा कोणती असेल? तर ती म्हणजे आई-वडिलांची सेवा होय. आणि याच सेवेचे व्रत धारण करणाऱ्या आपल्या पुंडलिकासारख्या भक्तासाठी त्या श्रीहरीलादेखील विटेवर उभे राहावे लागले. ही आषाढी एकादशीची वारी म्हणजे सर्व जातीधर्मातील घटकांनी भेदभाव विसरून एकत्र येण्याचा व ईश्‍वरी भक्तीत तल्लीन होण्याचा जणू एक सोहळाच आहे...

राजर्षी शाहू महाराज

छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. राधाबाई व जयसिंगराव हे त्यांचे आई- वडील. यशवंत हे शाहूंचे बालपणीचे नाव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. दत्ताकविधानानतर यशवंतरावांचे शाहू महाराज असे नामकरण झाले. इ.स. १८९४ साली म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी संस्थानाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. ..

योगदिन -  21जून

      योगेन चित्तस्य पदेन वाचां       मलं शरीरस्य च वैद्यकेन       यो s पाकरोन्तं प्रवरं मुनीनां       पतंजलिं प्रांजलिरानतो s स्मि ।। अर्थ : योगाद्वारा चित्ता..

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन

शाळा, क्लासेस नोकरी या मागे धावताना व आहार-व्यवहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे परमेश्‍वराने जे शरीर आपल्याला दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष होते व विविध रोगांना आमंत्रण दिले जाते. वास्तविक हे शरीर सांभाळण्याची आपली जबाबदारी आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होऊन लहान वयात मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग, नैराश्य यांना आपण बळी पडतो. आरोग्य सुधारण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, भल्या मोठ्या फी दिल्या जातात. त्यातूनही आरोग्य सुधारेलच याची शाश्‍वती नसते...

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन

शाळा, क्लासेस नोकरी या मागे धावताना व आहार-व्यवहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे परमेश्‍वराने जे शरीर आपल्याला दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष होते व विविध रोगांना आमंत्रण दिले जाते. वास्तविक हे शरीर सांभाळण्याची आपली जबाबदारी आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होऊन लहान वयात मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग, नैराश्य यांना आपण बळी पडतो. ..

नेत्रदान : श्रेष्ठदान

बालविकास विद्या मंदिराचे प्रांगण विद्यार्थी व पालकांनी फुलून गेले होते. गेले तीन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाचा आज समारोप होणारा होता. गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होता. प्रमुख पाहुणे होते, डॉ. पाटील - नामवंत नेत्रतज्ज्ञ. या वर्ष..

सोहळा शिवराज्याभिषेकाचा

‘‘रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधूनी अरुणोदय झाला अरुणोदय झाला...’’ ..

जैवविविधता

पृथ्वीची निर्मिती साधारण 5 अब्ज वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीवरील पहिला जीव समुद्राच्या उथळ पाण्यात 3.6 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. एकपेशी असणारा हा सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय जगणारा होता. आज मानवाने साधारण 20 लक्ष प्रजातींची नोंद केली आहे. एवढी प्रचंड ज..

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने १९४८ साली त्यांना एक लाख रुपयांचा निधी संत गाडगेबाबा यांच्या हस्ते अर्पण केला. या कार्यक्रमास राष्ट्रपिता महात्मा गांधीनी पाठवलेल्या संदेशात ते लिहितात, “श्री भाऊराव की सेवा ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है|’’..

ही भूमी महाराष्ट्राची...

महाराष्ट्राची भूमी संतांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे,इथे या पुण्याईची छत्र सावली सर्वाना मिळाली आहे, महाराष्ट्रात पर्वतराजी,जंगले,कडेकपारी,नद्या समुद्र यांनी समृद्ध असे पर्यावरण आहे,इथल्या मातीतून मोती पिकतात आणि कणसाला लगडलेले मोती सुफलीत मातीला कृत..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांची विविध ठिकाणी बदली होत असे. मात्र त..

महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार

19व्या शतकाचा विचार केल्यास या शतकावर ‘ज्ञान ही एक शक्ती आहे, शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे.’ या विचाराचा महाराष्ट्रात प्रभाव दिसतो. ‘विचार’ आणि ‘आचार’ याबाबत महात्मा फुले आदर्श होत. तत्कालीन समाजात शि..

वैद्यक क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी

लहानपणी वैद्यकक्षेत्राचे फार आकर्षण वाटे. तितकेच आकर्षण शिक्षणक्षेत्राचेही वाटे. या दुहेरी आकर्षणातून मला माझी वैद्यक-शिक्षक : Medical Teacher ही कारकिर्द गवसली. गेली 25 वर्षे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सेठ गो.सु. वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच सा..

पुरातत्त्वज्ञ मधुकर ढवळीकर

ढवळीकर, मधुकर केशव पुरातत्त्वज्ञ, लेखक 16 मे 1930 मधुकर केशव ढवळीकर हे अशा निष्ठावंत पुरातत्त्वज्ञांपैकी आहेत ज्यांनी आयुष्यभर पुरातत्त्वज्ञ म्हणून काम केलेच शिवाय त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक जणांना तयार केले. डॉ. ढवळीकर हे 1953मध्ये ऑर्कि..

'अस्मितादर्श'कार गंगाधर पानतावणे

वैचारिक आणि संशोधनपर लेखन करणारे गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडील गिरणीमध्ये कामगार होते. मात्र त्यांना एक शैक्षणिक दृष्टी होती. आपल्या मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना वाटत होते. वडिलांप्रमाणेच..

स्मरण वीरत्वाचे

कुठल्याही देशाचे खरे मोठेपण हे त्या देशात असणार्‍या सोन्यारत्नांच्या खाणी किंवा त्या देशातील धनदौलतीवरून ठरत नाही, तर देशात निरनिराळ्या क्षेत्रांत होऊन गेलेल्या व आजमितीस तिथे असलेल्या नररत्नांच्या संख्येवरून आणि त्याच्या उच्च सांस्कृतिक पातळीवरून ठरत..

चरित्र अभिनेत्री दुर्गा खोटे

खोटे, दुर्गा विश्‍वनाथ अभिनेत्री १३ जानेवारी १९०५ - २२ सप्टेंबर १९९१ हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या ठसठशीत अभिनयाने रजत  पडदा  गाजवून अनन्यसाधारण स्थान निर्माण करणार्‍या, तसेच चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शन आणि लघुपट, जाहिरातपट या क्..

पहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी

भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म १३ मार्च १८६५ साली पुणे येथे झाला. कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी ह्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या...

वैज्ञानिक अपर्णा जोशी

'ती' पृथ्वी , 'तिच्या' वरच्या तापमानातले बदल आणि  त्यावरील उपाय याविषयी 'ती' वैज्ञानिक  अपर्णा जोशी हिने  संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेले 'तिचे ' आणि इतरांचे विचार.......    "शालेय शिक्षक आलेख शिकवण्यासाठी विविध उदाहरणे घेतात..

डॉक्टर मॅक्सिन बर्नसन

भारतातून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणारे व त्यासाठी रांग लावून बसलेले अनेकजण आपल्याला माहिती असतील. परंतु उच्च शिक्षणासाठी भारतात येणारी व भारताच्या प्रेमात पडून इथेच राहून शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम उभी केलेली कुणी व्यक्ती आह..

पाऊलखुणा 'ति'च्या

8 मार्च ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत, आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. स्त्रियांसाठी अयोग्य मानल्या गेलेल्या क्षेत्रांत स्त्रियांनी मोलाची कामगिरी तर बजावली आहेच, पण या वेगवेगळ्या ..

जगावेगळी : डॉ. वसुधा आपटे 

न्यायवैद्यक शास्त्र हे सामान्य माणसाच्या आकलनापलीकडेच असतं असं मानलं जातं. खरं तर दूरचित्रवाणीवरील गुन्हेविषयक मालिकांमधून पोलिसांना एखादा मृतदेह मिळाला की, तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला जातो आणि त्याच्या अहवालावर आधारित तपासाची दिशा ठरवली जाते हे आता लहान..

स्व.कमलाताई काकोडकर

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या मातोश्री कमलाताई काकोडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १९२४ साली झाला. त्या काळात स्त्रियांना शालेय शिक्षण घेणे फार कठीण होते, तरीही त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशातील ..

गानहिरा  'हिराबाई बडोदेकर'       

ज्या काळात स्त्रियांनी गाणं बजावणं करणं तर दूरच, पण समाजात नुसतं मोकळेपणानं वावरणंसुद्धा निषिद्ध मानलं जात होतं, अशा काळात संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन, अखंड मेहनतीनं आपली कला जोपासून, "जाहीरपणे गायनाचे कार्यक्रम करणाऱ्या पहि..

आद्य क्रांतिकारक 

वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. “मी ईश्वरभक्त आहे. महर्षी दधिचीप्रमाणे माझ्या देशबांधवांसाठी त्यांच्या कल्याणासाठी माझेही बलिदान व्हावे. अशी माझी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे." हे उद्गार आद्य क्रांतिकारक..

थोर संशोधक : थॉमस अल्वा एडिसन

शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी खूप उपयुक्त शोध लावले. स्वयंचलित तारयंत्र, सोनोग्राफ, डायनामो, विजेचा बल्ब, विद्यूत मोटर, चलत चित्रपट असे अनेक शोध एडिसन यांनी लावले. अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म मिलान ओहियो येथे 11 फेब्रुवारी 1847 र..

निर्भीड सेनाधुरंधर

काही वर्षापूर्वीची गोष्ट. नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये एका स्वातंत्र्यवीराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी दुसरा सेनाधुरंधर उपस्थित होता. उंच, धिप्पाड, नजरेत असणारी भेदकता, तितकीच  सहकाऱ्यांसाठी ओथंबून वाहणारी माया, असे ते प्रभावी व्यक्तिमत्त्व समो..

स्वामीजी - एक चिंतन!

अंधकारमय हिंदुस्थानला प्रकाशमय करण्यासाठी अविरत तळपत राहणाऱ्या एका तेजोगोलाची आवश्यकता होती. जणू त्यासाठीच मकर संक्रांतीला समाजाला नवे परिणाम देणारा प्रज्ञासूर्य अवतरला. पौष वद्य सप्तमी, शके १७८४ म्हणजेच १२ जानेवारी..

भाषिक खेळ - भाग १५

‘खेळातून शिक्षण’ या संकल्पनेने आपण विद्यार्थ्यांचा भाषा अभ्यास घेऊ शकतो. अशा खेळांपैकी एक मजेशीर भाषिक खेळ म्हणजे Hot Seat Game होय. एक मुलगा फळ्याकडे पाठ करून खुर्चीत (Hot Seat) बसेल. शिक्षक किंवा वर्गातील विद्यार्थी कोणताही एक शब्द फळ्यावर ल..

मकरसंक्रांत

भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्त्व खूप मोठे आहे. सण साजरे करण्यातल्या उत्साह आजही, एकविसाव्या शतकातही कायम आहे, किंबहुना आजच्या काळात तो दुणावला आहे. सणांसाठी आवश्यक असणार्‍या आकर्षक आणि सहजी उपलब्ध होणार्‍या वस्तू हे त्यामागचे मूळ कारण आहे. त्या..

 योद्धासंन्यासी

आपल्या भारताला ज्ञानाचे भांडार म्हणतात. भारताची संत परंपरा ही खूप मोठी आहे. भारताला लागलेल्या अनेक थोर संतापैकी स्वामी विवेकानंद हे एक महान संतच होते. ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केलेल्या “रामकृष्ण मिशन..

भाषिक खेळ- भाग ९

खालील आकृत्यांमध्ये काही वाक्प्रचार दडलेले आहेत. ओळख पाहू ! उत्तरे उद्याच्या भागात  कालच्या भागाचे उत्तर    -प्रतिनिधी  [email protected]            ..

तेंडुलकरी नाटक

विजय तेंडुलकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. प्रारंभीचा बराचसा काळ पुणे, मुंबई येथे गेला. त्यांना आर्थिक अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. प्रारंभीच्या काळात अर्थार्जनासाठी नवभारत, मराठा, लोकसत्ता या दैनिकांत व नवयुग साप्ताहिकात त्यांनी पत्रकारिता केली. ‘वसुधा’ मासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले. ६ जानेवारी १९२८- १९ मे २००८ विजय तेंडुलकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. प्रारंभीचा बराचसा काळ पुणे, मुंबई येथे गेला. त्यांना आर्थिक अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. ..

भाषिक खेळ -भाग ६

मराठी भाषेत जे साहित्यिक आहेत 'मराठी भाषा पंधरवडा' निमित्त            १)कृष्णाजी केशव दामले                              १) २)प्रल्हाद केशव अत्..

भाषिक खेळ ५

भाषिक आदानप्रदान हा भाषा समृद्ध होण्याचा एक महत्त्वाचा घटक असतो. भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे भारतातील सर्वच भाषांमधे आदानप्रदान होत असते. ..

मातीशी नाते सांगणारी कवयित्री

इंदिरा नारयण संत या पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित. विजापूर जिल्ह्यातील ‘इंडी’ या तालुक्याच्या गावी दीक्षितांच्या कुळात जन्म झाला. त्यांचे वडील गोपाल सीताराम दीक्षित हे प्रशासकीय सेवेत मामलेदार होते. वडिलांची गावोगावी बदली झाल्याने कानडी मुळाक्षरे व थोडेसे लेखन-वाचन त्यांनी घरीच केले. ..

भाषिक खेळ - भाग ४

खालील चौकटीत शाळा व शिक्षणासंबंधीच्या ४० गोष्टींची नावे दिली आहेत. त्या शोधून काढा...

भाषिक खेळ - भाग ३

इंग्लिश हि जागतिक भाषा आहे आणि आज आपण या भाषेचा दैनंदिन व्यवहारामध्ये सातत्याने वापर करत असतो. अशा सातत्यपूर्ण वापराने इंग्लिश भाषेतील उपयुक्त शब्द आज मराठीच होऊन बसले आहेत असं वाटत. ..

भाषिक खेळ - भाग २

नमस्कार  १ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे. यानिमित्ताने मुलांना (मराठी भाषेची गोडी वाढावी यासाठी ) पंधरा दिवस रोज (सोप्या पद्धतीचे ) मराठी भाषिक खेळ  देत आहोत. भाग  २: ..

भाषिक खेळ--भाग १

नमस्कार  १ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे. यानिमित्ताने मुलांना मराठी भाषेची गोडी वाढावी यासाठी रोज पंधरा दिवस सोप्या पद्धतीचे मराठी भाषिक खेळ  देत आहोत. दिवस १: ..

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक

साराभाई, विक्रम भौतिकशास्त्रज्ञ १२ ऑगस्ट १९१९ – ३१ डिसेंबर १९७१ प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक. डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरात मधील अहमदाबाद येथील एका नामवंत उद्योजक घराण्यात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे महाविद्याल..

विलक्षण प्रतिभेचा कवी

पाडगावकर, मंगेश केशव मंगेश केशव पाडगावकरांचा जन्म वेंगुर्ले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव आत्मराव पाडगावकर. मंगेश पाडगावकरांच्या आई रखमाबाई त्यांना केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज ह्यांच्या कविता वाचून दाखवत असत. त्यामुळे बालवयातच पाडगावकरांना ..

माडखोलकरी साहित्य

गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म मुंबईत झाला. गणित विषयात गती नसल्याने मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षण सोडले पण त्यांचा संस्कृतचा व मराठीचा मोठा व्यासंग होता.’केसरी’चे संपादक न. चि. केळकर यांचे काही काळ लेखनिक होते. पुण्याच्या भारत सेवक मंडळातील कर्मचारी व ‘दैनिक महाराष्ट्र’त प्रवेश व तेथे साहाय्यक संपादक, पुढे तेथील ‘नर केसरी ट्रस्ट’तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘तरुण भारत’ दैनिकाचे १९४४ पासून १९६७ पर्यंत प्रमुख संपादक अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. संस्कृतप्रचुर, प्रौढ व सालंकृत ..

काळापुढती चार पाऊले

कर्वे, इरावती दिनकर ललित निबंधकार, मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्राच्या संशोधक १५ डिसेंबर, १९०५ ते ११ ऑगस्ट, १९७० इरावती बाईंचा जन्म ब्रम्हदेशात ‘Myingin’ येथे झालं. वडिलांचे नाव हरी गणेश करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई. त्यांना पाच भाऊ होते, ..

ऊर्जा स्रोत

ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या प्रकारांचा विचार केल्यास ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. पारंपरिक ऊर्जा : मुख्यत्वे कोळसा जाळून निर्मिलेली. अपारंपरिक ऊर्जा : सौर ऊर्जा, वायू ऊर्जा...

उमललेलं स्मित

विलक्षण बोलके डोळे आणि त्याला धारदार अभिनयाची साथ लाभल्यामुळे स्मिता पाटील यांनी आपली अल्प कारकिर्द आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने गाजवली...

महामानवाची देणगी :स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता

‘माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीव्र शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे. हे शब्द स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत. राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध. त्यांच्या शिकवणीपासून ते मी काढले आहेत. माझ्या तत्त्व..

भारतीय नौसेना

1947 साली जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी कॉमनवेल्थचे सभासदत्व स्वीकारल्यामुळे व 26 जानेवारी 1950 पर्यंत गव्हर्नर जनरल हाच सरकारचा प्रमुख असल्यामुळे ‘प्रजासत्ताक भारत’ जाहीर झाल्यावरच भारतीय आरमाराच्या नावातून ‘रॉयल’ हा शब्द वगळून ‘भारतीय नौसेना’ इंडियन नेव्ही या नावे भारतीय नौदल ओळखले जाऊ लागले व युद्धनौकांवर तिरंगा फडकू लागला. ..

लघुनिबंधकार अनंत काणेकर

अनंत काणेकर यांचा जन्म मुंबईला झाला. मुंबईतील गिरगावच्या चिकित्सक समूह हायस्कूलमधून ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२२). सेंट झेवियर महाविद्यालयामधून संस्कृत विषयात बी.ए. ची पदवी संपादन केली (१९२७). आणि १९३०-३२ मध्ये वकिलीची सनद घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिली सुरु केली. ती जेमतेम २-३ वर्षे केल्यावर अन्य व्यवसाय-वाटचालीसमवेत त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केल्याचे दिसते...

समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले

फुले, जोतीराव गाविंदराव महात्मा समाजसुधारक, ग्रंथकार, विचारवंत, कवी, शिक्षण तज्ज्ञ ११एप्रिल १८२७- २८ नोव्हेंबर १८९० पत्रकारिता आणि ललितेतर साहित्य खंड एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक जोतीराव गोविंदराव फुले यांनी ‘..

मराठी चित्रपट सृष्टीतील भालजी

पेंढारकर, भालचंद्र गोपाळ अभिनेता, पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक 3 मे 1898 - 26 नोव्हेंबर 1994 साठ वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत राहून स्वतःचे एक विशिष्ट स्थान निर्माण करणारे अवलिया म्हणजे भालजी पेंढारकर. अभिनेता,  कथाकार, पटकथाकार,..

कविता विंदांच्या

शिक्षणविवेकने बालदिनानिमित्त बालसाहित्यिकांची ओळख करून देणारे सात दिवसांचे सदर देण्याचा मानस केला आहे. त्यातील ६ व्या दिवशी विं दा करंदीकरांच्या ५ कविता ऑडिओ स्वरूपात देत आहोत...

मुलांचे भावविश्‍व उलगडणारा बालसाहित्यिक 

  मित्रांनो, बालदिनानिमित्त सुरू केलेल्या ‘ओळख बालसाहित्यिकांची’ या सप्ताहातील शेवटच्या लेखात जाणून घेऊयात ज्येष्ठ साहित्यिक ल.म. कडू यांच्याविषयी... आपल्या लेखन आणि चित्रकलेच्या माध्यमातून चिमुकल्यांचे भावविश्‍वाचे..

सुपरहिरो

“अशा आयडिया येतात कुठून रे बाईंना एकदम मॅड...”, इतक्यात मला समोर बघून आराध्य थबकला. तितक्याच शिताफीने वाक्य बदलून तो म्हणाला “माईंड ब्लोईंग आहेत बाई. अरे काकू आल्या. चला.”मुलांना शाळेतून आणायला जायला मला दहा मिनिटे उशीरच झाला होता...

खजिना बालसाहित्याचा

मुलांना लहानपणीच पुस्तकं वाचून दाखवावी या विषयावर आम्हा मैत्रिणींची चर्चा व्हायची. त्यातल्या एका खास मैत्रिणीने तिच्या मुलासाठी ७-८ वर्षांपूर्वी घेतलेली 'राधाचं घर ' मालिकेतली सगळी पुस्तकं उर्वी साधारण दीड वर्षांची असताना आणून दिली. त्या पुस्तका..

सहजी रमावे राजीव साहित्यात...

“त्या दिवशी मला समजलं, ज्यांना मुलांपेक्षा चांगल्या साड्या आवडतात. अशा बायका मुलांची तेल लावून चंपी करतात!!! त्यांना ती मुलं चंपी काकू म्हणतात.” आणि ज्यांना चांगल्या साड्यांपेक्षा सुद्धा तेलकट, तुपकट मुलं आवडतात. अशा मुलांना त्या बायका मायेन..

यारे या सारे गाऊ या

“या रे या सारे गाऊ या” असे म्हणत आपल्या लडिवाळ कवितांमधून मुलांना आवाहन करणारी ही कवयित्री आहे, डॉ. संगीता बर्वे. संगीताताई या आयुर्वेदाच्या डॉक्टर. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. ही पदवी घेतल्यावर त्यांनी ‘आयुर्वेदिक डाय..

भारतरत्न म. धोंडो केशव कर्वे

एकोणिसाव्या शतकात जे अनेक समाजसुधारक होऊन गेले, त्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजात त्या काळी अनिष्ट रूढी, परंपरा होत्या. त्या नष्ट करण्याचे काम अनेक समाजसुधारकांनी केले. त्यापैकीच एक परंपरा म्हणजे महिलांना न शिकवणे...

दिव्यत्वाची जेथ प्रचीती....

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व बनून जवळजवळ अर्धशतक महाराष्ट्राला रिझवणाऱ्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ ‘पुलं’ ह्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडिल लक्ष्मणराव देशपांडे उर्फ आबा ब..

विद्यार्थीदिनाच्या निमित्ताने

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी शाळेत दाखल झाले तो दिवस. ७  नोव्हेंबर. यावर्षीपासून विद्यार्थीदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. गावकुसाबाहेर राहून, शाळेच्या व्हरांड्याच्या बाहेर बसून शिक्षण घेतलेले बाबासाहेब भारताचे संविधान लिहितात, आज..

संदेश 

 सकाळचे नऊ वाजले होते. गरम वाटू लागलं होतं. बाबा कामाला गेले होते. आई किचनमध्ये होती. यश आणि अनुष्का अजूनही अंथरुणावर लोळत होते. त्यांना उठायची इच्छा नव्हती. एकमेकांच्या खोड्या काढत ते पडले होते. अचानक यशला काहीतरी आठवलं. त्याने पडल्यापडल्या शिट्टी व..

हातचलाखी

स्नेह, तुझा सगळ्यात आवडता वार कोणता? स्कूल बसमध्ये ओंकारने स्नेहला विचारले. अर्थात शनिवार. तुला, मला, आपल्या वर्गातल्या सगळ्यांना आणि सोसायटीतल्या मित्रांनाही, शनिवारच आवडतो. काय मज्जा असते ना आपली शनिवारी, होमवर..

सुटका

शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर आईबरोबर येताना तेजस खूश असायचा. आई कधी आईसक्रीम कधी फ्रुटडिश, कधी कलिंगड, पेरू, ज्यूस काही नं काही हमखास द्यायची. आजही आईसक्रीम पार्लरसमोर थांबल्यावर तेजसने आवडता चोकोबार घेतला. निघताना तो आईला म्हणाला, आई आणखी एक विकीला बर..

कबुली

साकेतला आज कधी घरी पोहोचतो असं झालं होतं. घटक चाचणीच्या उत्तरपत्रिका मिळायला शाळेत सुरुवात झाली होती. गणितामध्ये सर्व वर्गात त्यालाच जास्त गुण मिळाले होते. फक्त एकच गुण कमी मिळाला होता. कधी एकदा घरी जाऊन आईला पेपर दाखवतो, असं त्याला झालं होतं. त्याला का..

पक्षी उडून गेला... भूर्रऽऽऽ

इयत्ता दुसरीत शिकणारा नील तसा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. अभ्यासात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा नील इतर गोष्टीतही चौकस आणि जिज्ञासू होता. प्राणी-पक्षी, झाडे-झुडपे, नदी-नाले, याविषयी त्याला प्रचंड प्रेम वाटायचं. फिरायला जाताना वाटेत रस्त्याकडेला लाजाळूचं..

मधमाशी

“मधमाशांच घर मोडून का काढला हा मध? तूच म्हणतेस ना की दुसर्‍यांचं घर नाही मोडायचं म्हणून? एकदा कबुतरांनी घरट केलं होतं, कुंडीमध्ये आणि अंडी घालणार होते... आणि बाबा ते काढायला गेला तर तूच म्हणालीस ना कुणाचंही घर नाही मोडायचं मग?”..

जेव्हा देव प्रसन्न होतो..

उमेश आठवीत होता. एका चांगल्या शाळेत होता. अगदी पहिला, दुसरा नंबर नसायचा, पण तसा हुशार होता. खोखो खेळायचा. आता घरचे म्हणाल तर सगळे चांगले होते.पण तरीही उमेश अस्वस्थ होता. कारण त्याला हे सगळं पुरेसं वाटत नव्हतं. त्याला ना मोठं व्हायचं होतं...

गोष्ट कळताना...

आपल्याला सगळ्यांना लाकूडतोड्याची गोष्ट माहीत असते. कुर्‍हाड पाण्यात पडली मग देवाने त्याला रडताना पाहिले. त्याला आधी सोन्याची, मग चांदीची आणि शेवटी लोखंडाची कुर्‍हाड काढून दिली. आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी ही गोष्ट ऐकली असेल. आपल्यापैकी जे पालक अ..

पराक्रमाचे प्रतीक : विजयादशमी

दसरा म्हणजे दश = दहा इंद्रिये + हरा = विजय मिळविणे. आत्मशक्तीने दहा इंद्रियांवर विजय मिळवून मोहाच्या महिषासूराला मारण्याचा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’ होय...

स्वदेशी सुरक्षा अभियान व आपण

चीन हा आपला शेजारी देश, पण 1962च्या युद्धापासून तो सतत भारताच्या कुरापती काढणे, भारतीय भूमीत घुसखोरी करणे, तसेच दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍या पाकिस्तानासारख्या राष्ट्रास पाठिंबा देणे, भारताविरुद्ध लढण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे यांसारखी कामे करून ..

स्वदेशी स्वदेशी

‘स्वदेशी’ शब्दाला इतका छोटा अर्थ नाही. त्याला विशाल अर्थ आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून स्वदेशी बाणा प्रकटत असतो...

विवेकाची पूजा

  दुर्गा, भद्रकाली, अंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंद्रिका, ललिता, भवानी, मूकांबिका अशा प्रतिमांच्या रूपांत नऊ दिवस पूजली जाणारी देवी! हा नऊ दिवसांचा उत्सव म्हणजे नवरात्र! आपल्या संस्कृतीत नऊ दिवस वेगवेगळी धान्य पेरून दहाव्या म्हणजे दसर्&zwj..

देवीस्तुती

मराठी तील अ ते ज्ञ अक्षरे घेऊन केलेली देवीस्तुती..

विजयाला गवसणी घालू !!

‘मोठेपणी कोण व्हायचंय?’ शालेय जीवनात विचारला जाणारा प्रश्न, ज्याची उत्तरही ठरलेली असतात...

कोकणातील पाऊलखुणा ७

नमस्कार मित्रांनो!, कसे आहात? श्रावण सरला, त्यानंतर भाद्रपद आला. पुढच्या वर्षी परत येण्याचं आश्वासन देऊन गणपती बाप्पा गावाला गेलेसुद्धा. हळूहळू पाऊसही ओसरू लागलाय आणि ऑक्टोबरमधल्या उन्हाने सप्टेंबरमध्येच आपली जाणीव करून द्यायला सुरू केली आहे. भरपूर पडलेल्..

सण, उत्सव आणि बाजारपेठेतील चलन

आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आहोत. देशभरात वर्षभर कुठेना कुठे सण, उत्सव साजरे होत असतात. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वांत मोठा उत्सव आहे. गणपती हे मराठी माणसाचं आराध्य दैवत आहे आणि या गणपतीचा उत्सव फक्त महाराष्ट्रातच, नाही तर इतरही अनेक शहरात, राज्यात साजरा होत असतो. आता उत्सव म्हटला की खूप गोष्टी आल्या. गणपतीच्या मूर्तीपासून ते मिरवणुकांमधल्या वाद्यांपर्यंत आणि डेकोरेशनपासून ते भक्तांना वाटल्या जाणाऱ्या प्रसादापर्यंत कितीतरी गोष्टी या उत्सवाशी निगडित आहेत. या सगळ्या निमित्ताने ..

खाद्यपदार्थांची बाजारपेठ 

खाद्याभ्रमंती  भारतीय सण हे चराचरांत, मनांमनांत उत्साहाचं भरतं घेऊन येतात. कौटुंबिक, सामाजिक वातावरणातून जाणवणारा या सण-उत्सवांचा आनंद अलीकडे बाजारपेठांमधूनही ओसंडत असल्याचं चित्र दिसतं. त्या त्या उत्सवासाठी आवश्यक असणारं सारं काही घेऊन बाज..

गणेशपूजन : नवी दृष्टी

  गणेश चतुर्थीनिमित्त अभ्यासाचे किंवा नवनवीन ज्ञानाचे संकल्प करावयाचे असतात. रसरसलेला निसर्ग आणि माझ्या आतला ‘मी’ यांचे सामरस्य घडवावयाचे असते. विनम्र मनाने साधना करावयाची. प्रसन्न मनाने, आर्ततेने श्री गजानन..

विंदांची बालकविता - एक सागर

  माझ्या पिढीच्या लोकांसाठी मराठी बालसाहित्य म्हटलं की तीन नावं प्रामुख्याने समोर येतात, भा. रा. भागवत, विंदा करंदीकर आणि रत्नाकर मतकरी. मतकरींनी लहान मुलांसाठी नाटकं लिहिली, तर भा. रा. भागवतांचं रहस्यप्रधान बालसाहित्य मराठीत प्रचंड लोकप्रिय ..

शिक्षणपद्धतीवरचे भाष्य...

वर्धापनदिन कार्यक्रम  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, छत्रपती शिक्षण मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी या पाच संस्थांच्या शाळांमध्ये जाणाऱ्या ‘शिक्षणविवेक’ मासिकाच्या ५ व्या वर्धापनदिनाचा जाहीर कार्यक्रम शिक्षण सचिव मा. नंदकुमार आणि ज्येष्ठ बाल साहित्यिक मा. राजीव तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी सा. विवेकचे प्रबंध संपादक मा. दिलीप करंबेळकर, टी.बी. लुल्ला चारिटेबल फौंडेशनचे चेअरमन किशोर लुल्ला, ..

गाणी प्रेरणेची.... 

देशभक्तीपर गीतांना अजून एक वैशिष्ट्यपूर्ण किनार लाभलेली आहे, ती नवचैतन्याची. या गीतांच्या शब्दांमध्ये जेवढे आणि जितके नवचैतन्यदायी अर्थसामर्थ्य दडलेले आहे, तितके आणि तेवढेच त्यांच्या संगीतातही दडलेले आहे. पावसाळ्याचे आल्हाददायी वातावरण असणारा आणि निरनिराळ्या सणांना घेऊन येणारा हा महिना, ऑगस्ट महिना. आनंद देणारा, मनाला चेतना देणारा, आपल्या सगळ्यांना भारावून टाकणारा, मंत्रमुग्ध करणारा, तजेला देणारा हा महिना. या सगळ्या गोष्टींचे सांस्कृतिक म..

गोपाळकाला

गोपाळकाला  श्रावण वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. या दिवशी मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. भारतीय संस्कृतीने आणि धर्माने मानलेल्या भगवंताच्या दशावतांरापैकी श्रीकृष्ण हा आठवा अवतार होय. म्हणूनच या दिवशी रात्री बारा वाजता कीर्तन-भजनाने हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी जन्मोत्सवाचा उत्सव म्हणून गोपाळकाला हा उत्सव अतिशय उत्साहात भारतात सर्वत्र साजरा ..

हास्यचित्रकार

  फडणीस, शिवराम दत्तात्रेय  हास्यचित्रकार  २९ जुलै १९२५   शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज या छोट्या खेडेगावी झाला. तेथे मिळेल तेवढे शिक्षण घेऊन फडणीसांनी कोल्हापुरात स्थलांतर केले. तेथून १९४४ साल..

कोकणातल्या पाऊलखुणा ६

सहउत्पादने  हाय फ्रेंड्स! कसा वाटतोय हा कोकणाशी होणारा परिचय. आवडतोय नं? मलाही खूप मज्जा येतेय तुमच्याशी गप्पा मारताना. इथपर्यंत आपण कोकणातील घरं, तेथील संस्कृती, तिथलं राहणीमान, शेती, वापरातील वस्तू-पदार्थ याबद्दल वाचत आलो. मागच्या लेखात आपण को..

इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...

नवनिर्मिती  सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार? आप..

कृषी सप्ताह - ६: कथा - कलिंगडाची सहल

लहान मुलंच काय आपल्यापैकी प्रत्येकजण राहात्या वातावरणाशी इतके समरस झालेले असतो, की वेगळ्या वातावरणात गेल्यावर तिथे स्वतःला स्थिर करायला आपल्याला कमीजास्त  वेळ लागू शकतो. तसाच वेळ एका शालेय विद्यार्थ्याला गावातून शहरात जाताना लागला आणि  त्याच्या वातावरणातल्या बदलामुळे स्थिरता देण्यासाठी त्याचे पालक, शिक्षक  त्याला मदत करतात. त्याची कथा. ..

कृषी सप्ताह - लेख ५ : बीज अंकुरे.. अंकुरे

माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्षसंपदा! ही वृक्षसंपदा टिकावी, जैववैविध्य टिकावे यासाठी विविध झाडांची बीजे टिकवणे, त्यांची रुजण्याची प्रक्रिया जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते समजावून सांगणारा वैज्ञानिक स्वाती केळकर यांचा लेख. ..