माझ्या तीन वर्षांच्या नातवाला मी सांगत होते, ‘हे तांब्यातलं पाणी त्या झाडाला नेऊन घाल. ती बाटली दिसतेय ना, त्याच्या जवळच्या झाडाला. अरे, तुझ्या समोर आहे बघ!’ त्याने काहीच केलं नाही. हातात छोटा तांब्या होता. समोरचं झाड तुळशीचं होतं. समोर अनेक झाडं होती. तो ज्या दिशेला तोंड करून उभा होता, तिकडे मात्र झाड नव्हतंच. मला वेळ नव्हता. त्याच्या हातातला तांब्या घेऊन मी पाणी ओतून आले. ज्या झाडाला पाणी घालणं अपेक्षित होतं, ते हे झाड नव्हतंच. असं का झालं? असाही विचार करू लागले. आपल्या मुलांचं काय झालं असेल? ..