निसर्गभान

उन्हाळ्यातील भटकंती - गड व किल्ले

  उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय, सुट्टीत काय काय करायचं, याचं नियोजन मात्र आधीच तयार असेल! कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो! परीक्षेचा सगळा ताण,..

खंड्या

  अन्वयची वार्षिक परीक्षा संपली. आता खूप मज्जा! मे महिन्याची सुट्टी लागली. या वेळी अन्वय कोकणात मामाकडे जाणार होताच. पण अजून वेळ होता. आई-बाबांची रजेची व्यवस्था झाल्यावर त्याला जाता येणार होतं. तोपर्यंत अन्वयच्या मामाची मुलगी ओवी त्यांच्याकडे येणा..

प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून हँगिग पॉट्स

    आपण बाहेरगावी प्रवास करताना पाण्याच्या बाटल्या विकत घेतो व पाणी संपल्यानंतर त्या फेकून देतो. अशा बाटल्यांचा वापर आपण छोटी छोटी रोपे लावण्यासाठी करू शकतो. साहित्य :  प्लॅस्टिकची रिकामी बाटली, पंचिंग मशीन  (किंवा बाटलीला व्यवस्..

पक्ष्यांचा फराळ

  चिमण्यांची संख्या कमी झाली आहे, त्या दिसतच नाहीत असे मध्यंतरी बरेचदा ऐकू येई. ते आम्हालाही थोडे जाणवलेच. नाहीतर सकाळी कधी ५.३०-६ वाजतायत तोच कावळ्यांची कावकाव, चिमण्यांची चिवचिव चालू होई, त्यामुळेच आम्हाला जाग येई. गजराची गरजच लागत नसे. चिमण्या..

फुलवा घरची शेती - भाग २

  झाडांना स्वच्छता लागते. घरगुती बी पेरू नये. लिंबाचे कलमच लावावे. एक वर्षात ४०/५० फळे मिळतात. निर्माल्य खत = २० इंच लांब - ४ इंच रुंद = इंच खोल खड्डे, त्यात ३-३ फुटाचे पार्टिशन व जाळी लावणे. (उंदीर, घुशी बंद.)   काय कराल? महत्त्वाचे - झा..

फळांच्या साली आणि बियांचा वापर

  मुलांनो, मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही गावाला जाऊन आवडीने कोणतं फळ भरपूर खाता ? मी सांगू, आंबा होय ना ? तसं फणस, करवंद, बोर, जांभळं, वगैरेही खात असाल ना ? पण अशा बऱ्याच सालींपासून, बियांपासून आपण काहीतरी करू शकतो. कसं, सांगू... कोणकोणती फळं असत..

फुलला बनी वसंतबहार...

  “ फुलला बनी वसंतबहार ” नावाचं नाट्यगीत पूर्वी खूप ऐकू यायचं... आजही वसंताचं म्हणजे वसंत ऋतूचं वर्णन करणारी अनेक गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. चैत्र आणि वैशाखाचे महिने म्हणजे वसंत ऋतू म्हणजे ऐन उन्हाळ्याचे दिवस. इंग्रजीतले मार्च, एप्र..

गुलबक्षी

  गुलबक्षी या फुलाला संस्कृतमध्ये चंद्रकली म्हणतात. हि औषधी वनस्पती एक मी. उंच वाढते. ती शोभिवंत तर आहेच पण ती अनेक वर्षे जगणारी असून ती मुळची मेक्सिको व पेरू देशातील आहे. त्यावरून त्याला इंग्रजीत ‘मार्व्हल ऑफ पेरू’ असे म्हटले जाते. तस..

एक झाड लावू मित्रा

  अनादी काळापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येक गोष्टीसाठी मानव जंगलावर अवलंबून राहत आला आहे. जंगलावर म्हणजे वनस्पतींवर, पोटाची भूक असो कि घालायला कपडे, एवढंच काय, जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायूदेखील आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतो आणि तोद..

फुलवा घरची शेती

  कचऱ्यापासून खत सध्या रोज निघणारा टनावारी कचरा कोठे, कसा टाकायचा, (डंपिंग) हा नगरपालिकेपुढे यक्षप्रश्न उभा ठाकलेला आहे. त्याची विल्हेवाट कशी लावायची ? तो कचरा वाहून नेण्यासाठी सध्या मनुष्यबळ (श्रम) व पैसा खूप लागत आहे. तरीही त्या प्रश्नाचे गांभी..

एक छोटासा प्रयत्न

  (शंतनू उन्हाळी सुट्टीत शिबिराला गेला होता. सह्याद्रीच्या कुशीत, कोकणात, तिथल्या सदाहरित जंगलात सफर केल्याने त्याचे मन ताजेतवाने झाले. तेथील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ परिसर त्याला जास्त आवडला. नकळतच त्याच्या मनाने आपल्या शहरातील परिसराची आणि शिबिराच..

बीज नुरे तरू डोलात डुले

  दोस्तांनो उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे मस्त धमाल करत असाल ना? मित्रांसोबत अन् घरच्यांबरोबर भेळ, पाणीपुरी, आईसक्रीम, पिस्ता, नुडल्स, गड, किल्ले, अभयारण्य, जंगल सफारी अशा प्रकारचे ‘हटके’ बेतही आखले असतील! कधी कधी घराजवळच्या बागेत, मै..

जर्बेरा

  आजकाल जर्बेरा फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. जर्बेरा हे ठेंगणे, बहुवर्षीय फुलझाड आहे. मैदानी, फडी अशा भिन्न प्रदेशात ते वाढू शकते. याची उंची ३० - ४५ से.मी. इतकी असते. तर विस्तार सुमारे १५ से.मी. असते. फूल १२-१५ से.मी. व्यासाचे एकेरी, दुहे..

हिरवं हृदय

  परवा नातीला भेटायला गेले.  गेल्याबरोबर  आज्जी ऽऽऽ म्हणून गळ्यात पडणारी नात टीव्हीवर नजर लावून बसलेली! मी माझ्या लेकीला विचारलं आज काय झालं परीला? इतकी कधी गुंतून पडत नाही टीव्हीवरच्या कार्यक्रमात! नेहा, नको बाई सवय लावू तिला टीव्ही बघण..

अ‍ॅस्टर

हे मुख्यत्वे थंड हवामानाचे पीक. पण तिन्ही हंगामात यांची लागवड केली जाते...

पक्षी जगत - खंड्या

  आज आपण ‘खंड्या’ पक्ष्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या. खंड्या हा आकाराने लहान असणारा पक्षी. या पक्ष्याचे शास्रीय नाव Halcyon smymenis असे आहे. पण चपळाईने मासे पकडण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्याला ‘किंगफिशर’ हे ..

आपले पर्यावरण

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर होय. पर्यावरणात भू-आवरण, वातावरण, जलावरण या अजैविक घटकांचा, तसेच जीवावरण या जैविक घटकाचा समावेश होतो. हे सर्व घटक निसर्गनिर्मित आहेत. याशिवाय पर्यावरणात घरे, रस्ते, कारखाने, धरणे, पूल, वाहने इत्यादी अनेक मनुष्यनिर्..

कोरांटी

अबोलीबरोबर कोरांटीची आठवण येतेच. काही काही फुलांच्या जोड्या अतूट असतात. जसं जाई-जुई, झेंडू, शेवंती. कोरांटीला कळसुंदा असेही म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव बार्लोरीया मिओनिटीस असे असून त्याचे कूळ अॅकँथेसी हे आहे. सुमारे ०.६-१.५ मीटर उंचीचे हे झुडूपवर्गी..

पुनर्वापर कचर्‍याचा

मध्यंतरी पुण्याच्या बिशप्स स्कूलमध्ये जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात कुंड्यांमध्ये सुंदर रोपं होती. कौतुकाने झाडांना न्याहाळत असताना तिथल्या बाईंनी  सांगितलं, “ही झाडं आमच्या मुलांनी कमावलेली आहेत.” “कमावलेली?” मी न कळून विचारलं. “गेल्या वर्षाच्या अखेरीस मुलांनी त्यांच्या वह्या शाळेत गोळा केल्या, त्यातले कोरे कागद वेगळे केले  आणि उरलेल्या वह्या रद्दीवाल्याला विकल्या, त्यातून आलेल्या पैशातून रोपवाटिकेतून फुलझाडांच्या कुंड्या आणल्या. टवटवीत झाडं आणि त्यामुळे ..

पक्षीजगत

  कौलारू घराच्या वळचणीवर चिमण्यांनी बांधलेले घरटे कदाचित आपण सगळ्यांनी पहिले असेल. वृक्षांऐवजी कौलारू घरात घरटे बांधण्याचा  सोईस्कर पर्याय निवडून चिमणी मोकळी होते, पण इतर लहान मोठ्या आकाराच्या पक्ष्यांना असे करणे सहज शक्य नसते. त्यामुळे अशा प..

अनंत

  Anant अनंताला गंधराजही म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव गार्डेनीया प्लोरीडा. त्याचे कुल रुबिएसि. बागेतील लोकप्रिय व अत्यंत सुमधुर वासाचे फूल. झुडूपवर्गीय असून ते मूळचे चीन, जपान येथील आहे. सदाहरित असे हे झाड. उष्णकटिबंधातील हे आहे. याची प..

कृष्णकमळ

  कृष्णकमळ ही पॅसिफ्लोरेसी कुळातील सदाहरित / निमसदाहरित वनस्पती वेल. याच्या ४०० जाती आहेत. पण त्या शोभेसाठी लावल्या जातात. याचे शास्त्रीय नाव पॅसिफ्लोरेसी. याच्या कुळातील २४ जाती मुळच्या दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील आहेत; पण आता इतर उष्णकटिबंध..

शहाणी स्नेहा

  एक छोटीशी मुलगी होती. तिचे नाव होते स्नेहा. खूप लाघवी होती. तिसरीत शिकत होती. वर्गाची मॉनिटर होती. एकदा ती खूप उदास झाली. तिला भाऊ बहीण नसल्याने तिच्याशी खेळायला कुणीच नव्हते. मामाला टॉयफाईड झाला म्हणून आई त्याला पाहायला हॉस्पिटलमध्ये गेली होती...

ठिपकेवाली मुनिया

  काही पक्षी जोडीने तर काही पक्षी समूहाने राहणे पसंत करतात. उदा., चिमण्या, बदके, सुगरण, मैना, पोपट आणि मुनिया हा पक्षी आकाराने लहान असल्यामुळे समूहाने वावरताना दिसून येतो. या लेखात आपण ठिपकेवाली मुनियाची सविस्तर माहिती घेऊ. सर्वसाधारणपणे चिमणीपेक्षा..

भटकंती - किल्ला हरिश्चंद्र

अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगररांगेतील हरिश्‍चंद्र किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय. ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदूर्ग प्रकारातील आहे. ..

पावसाळी बहर- रानफुले - भाग २

जंगल पावसाळ्यात बहरतं, बोलत, नाचत आणि नाचवतोही. पटकन लक्षात येतील अशाच फुलांचा मागोवा यात घेतला गेलाय, ही फुलांची उधळण अशीच पाहाता यावी अशी इच्छा असेल तर गरज आहे जंगल वाचण्याची, वनस्पतींचा नैसर्गिक अधिवासाच्या रक्षणाची आणि मुख्य म्हणजे सजग पर्यटनाची. ..

पावसाळी बहर- रानफुले - भाग १

पावसाळा; तीन ऋतूमधील एक अत्यंत महत्त्वाचा ऋतू. उन्हाच्या लाहीने तापलेल्या धरणीला शांत करण्यासाठी नव्हे तर तिच्या गर्भातून विविधरंगी वनस्पती आणि फुले यांचा खजानाच बाहेर काढण्यासाठी जणू मदत करणारा ऋतू...

मुळा-मुठामधील मी मुठा..

आज किनई मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. आज माझी माहिती तुम्हाला सांगताना माझ्याविषयी जी माहिती मी ऐकली आहे ती तुम्हाला सांगणार आहे. माझ्याबद्दलची ही माहिती जीवितनदी या संस्थेचे स्वयंसेवक यांनी सांगितली. ही माहिती ऐकून मलाही खूप छान वाटलं. आज किनई माझ्या नदी काठावर काही शाळेची मुलं आली होती. ..

अवसेचा पाऊस

  “आज अवसेचा पाऊस आहे रे, कशाला जाताय डोंगराकडे?” आईनं आम्हाला थांबवत विचारलं. तेव्हा मी म्हटलं, “हे बघ आई... अमावस्या पौर्णिमेला काहीही विशेष घडत नसतं.” त्यावर आई म्हणाली, “नाही कसं? चंद्राच्या प्रभावामुळेच तर समुद्र..

पावसाळ्यातील भटकंती

जंगलाचा अनुभव घ्यावा; तर तो पावसाळ्यात घ्यावा, असं म्हणतात. आणि तो योग्यच आहे. ताम्हिणीचे जंगल अशा पावसाळ्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे. तिथे अनेक देवराया आहेत. त्यात असंख्य प्रकारच्या भारतीय वनस्पती आहेत. तसेच, विविध पक्षी, प्राणी, फुलपाखरे आहेत. ताम्हिणी घाटातील जंगलसमृद्धी बघून आपले मन अगदी प्रफुल्लित होते...

शोधू नवे रस्ते - भाग ३

अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी दिल्लीतल्या एका ऑफिसात लिफ्टची वाट बघत उभी होते. लिफ्टचं दार उघडलं, तेव्हा लिफ्टमधून चक्क एक लंगूर जातीचं दोरीने बांधलेलं माकड आणि त्याला घेऊन जाणारा माणूस बाहेर पडला. मला आश्चर्याचा धक्काच बसला की, एखाद्या ऑफिस बिल्..

महासागर वाचवण्यासाठीचा जागर

महासागर, असं म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे पाण्याचा एक विस्तृत आणि अथांग असा साठा. परंतु महासागर हा यापेक्षा सुद्धा जास्त गहन आणि गूढ असा विषय आहे. याचं कारण असं आहे की, शास्त्रज्ञांच्या मते मनुष्याने सुमारे ९० टक्के जमीन ही पिं..

प्रतिज्ञा पर्यावरणाची

५ जून  ... जागतिक पर्यावरण दिन. यंदाच्या या पर्यावरणदिनाचा यजमान आपला भारत देश आहे आणि "प्लास्टिक प्रदूषणावर मात" हे या वेळचे घोषवाक्य आहे.  पर्यावरण जपण्याकरता अनेक कायदे अस्तित्वात आहेत. परंतु युरोप, अमेरिका या देशांतील नागरि..

मी तापी...

माझा उगम मध्य प्रदेशातील बतुळ या जिल्ह्यातील मुलताईच्या आरक्षित जंगलातून होतो. मुलताईमधून वाहत येऊन मी सातपुडा पर्वतामधून पश्चिम दिशेला वाहत जाते. तेथून मी वाहत वाहत महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्रातील खानदेशातील पठारामधून; तसेच गुजरातमधील सुरत येथील मैदानी भागातून वाहत मी शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. ..

जैवविविधता

पृथ्वीची निर्मिती साधारण 5 अब्ज वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीवरील पहिला जीव समुद्राच्या उथळ पाण्यात 3.6 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. एकपेशी असणारा हा सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय जगणारा होता. आज मानवाने साधारण 20 लक्ष प्रजातींची नोंद केली आहे. एवढी प्रचंड ज..

 मी पश्चिमवाहिनी नर्मदा...

मी भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. माझा उगम पूर्वेकडून होऊन मी पश्चिमेकडे समुद्राला जाऊन मिळते. अशी मी नर्मदा... मला रेवा असेही म्हंटले जाते. रेवा या शब्दाचा अर्थ ‘पर्वत-पठारावरून उड्या मारत वाहणारी’ असा होतो. मला मध्य प्रदेश राज्..

परिसरातील विज्ञान

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी केवळ शाळांतील चार भिंतीत विज्ञान न शिकवता, परिसरातील गोष्टींचा उपयोग करून घेणे; ही संकल्पना राबवली मीना म्हसे यांनी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू खुर्द, तालुका हवेली, जिल्हा प..

एका जगा वेगळ्या पालक–पित्याची कहाणी

छत्तीसगडचं कोटमी सोनार गाव. तेथे मोठं मगरींच पार्क आहे. ते बघायला अनेक लोक येत असतात. असेच एकदा बरेच पर्यटक आले होते. तेवढ्यात अचानक एक व्यक्ती मगरींच पार्क असलेल्या तळ्याकाठी येते. ती व्यक्ती तोंडातून काही वेगळाच आवाज काढू लागते आणि काय आश्चर्य! त..

एक झाड लावू मित्रा

एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे खाऊ प्रत्येकाने आपल्या लहानपणी शाळेत हे गाणं ऐकलं असेल. प्रत्येकाला वाटतं, आपणही एखादं झाडं लावावं आणि त्याला मोठं होताना पाहावं. पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. हौसे, नवसे आणि गवसे सगळेच आ..

नदीबद्दल इंटरेस्टिंग काहीसे...

आपण नदीबद्दल बरंच काही ऐकून असतो. कधीतरी भूगोल विषय शिकताना शिक्षकांनी विचारले असेल, "सांगा बघू नदी म्हणजे काय?" तर अशा वेळी नदीची काय बर व्याख्या सांगता तुम्ही.? नदी म्हणजे अखंड वाहणाऱ्या खळखळत्या पाण्याचा झरा. असं जर तुम्ही सांगत असाल, तर अगदी बरोबर! ..

सफर बांधवगड व्याघ्रप्रकाल्पाची

विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच परीक्षा संपणार असतील. सुट्टी लागल्यावर तुम्ही सहलीचे नक्कीच नियोजन करत असाल, तर मग मी एक ठिकाण सुचवतो, ते म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील बांधवगड व्याघ्रप्रकल्प. बांधवगड हे अभयारण्य मध्य प्रदेशमधील सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्या..

बदके सुरेख....

बदक असा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर लांब चोचीच्या पांढऱ्याशुभ्र पक्ष्यांची रांग तरंगू लागते. आपल्या डोक्यात हे एवढेच काय ते बदकाचे चित्र, त्यांचे वर्णन तयार असते. पण मित्रांनो, आपल्या या परिचित पक्ष्याचे अनेक प्रकार असतात. वेगळ्या जातीच्या बदकांची ..

जपू या जंगल ठेवा

‘मानवी वस्तीत बिबट्याने हल्ला करून अमूक इतक्या माणसांना जखमी केले. बिबट्या, वाघ विहिरीत पडला’, अशा बातम्या आपण अलीकडे बर्‍याचदा ऐकतो. वन्य प्राणी मानवी वस्तीत का येतात? कारण जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वाघ, सिंह, बिबट्या आणि अन्य वन्य..

पुनर्वापर कचऱ्याचा

मध्यंतरी पुण्याच्या बिशप्स स्कूलमध्ये जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात कुंड्यांमध्ये सुंदर रोपं होती. कौतुकाने झाडांना न्याहाळत असताना तिथल्या बाईंनी सांगितलं, “ही झाडं आमच्या मुलांनी कमावलेली आहेत.” “कमावलेली?” मी न कळून विचा..

जलचक्र

जलचक्र म्हणजे पाण्याचे चक्र. चक्र म्हणजे चाक, एक गोलाकार वस्तू, ज्याला शेवटची टोके नसतात, ज्याची सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही..

बोनसाय : एक कला

बोनसाय म्हणजे मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती. पण नुसते खुजे झाड नव्हे. त्याला फळे, फुले हे सारे निसर्गातल्याप्रमाणे असायला हवे. ..

निसर्गाची अन्नसाखळी

निसर्गातले सगळे घटक आपापली कामं नेमून दिल्याप्रमाणे करत असतात. ना कधी वाघाला गवताची चव घ्यावीशी वाटते, ना कधी सांबरांना मांस खाऊन बघावेसे वाटते. निसर्गात ढवळाढवळ करण्याची हौस फक्त आपल्याला म्हणजे मनुष्यालाच आहे...

शांतिनिकेतन : वृक्षरोपण उत्सव

शांतिनिकेतनमधे वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. जसे, नववर्ष उत्सव, वसंतोत्सव, हलकर्षण, वृक्षरोपण इ. रवींद्रनाथांचा मुलगा रथींद्रनाथ हे वन-उपवन शास्त्रातले जाणकार. त्यांनी वृक्षरोपण उत्सव सुरु केला. रवींद्रनाथांच्या मृत्यूनंतर हा उत्सव २२ श्रावण, म्ह..

वानरांचे भावविश्व

आपले आणि माकडांचे पूर्वज एकच होते, हे पदोपदी जाणवतं. त्यांच्या हालचाली, खाण्याची आणि बसण्याची पद्धत आणि महत्वाचं म्हणजे एखाद्या घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनेमागे येणारी प्रतिक्रिया आपल्याला मुग्ध करते. आपल्या आसपासच्या जंगलांमध्ये काळ्या तोंडाची माक..

जंगलातली रंगांची उधळण

जंगलातली रंगांची उधळण: चला तर या वेळेस आपण जंगलामध्ये रंग पाहायला जाऊ या. बघू या तरी आपला निसर्ग किती प्रकारचे रंग दाखवतो ते. कल्पना करा एक असं जंगल आहे की जे घनदाट तर आहेच पण जिथे पाण्याची कमतरता नाही, प्रचंड प्रमाणात डोंगर-दऱ्या आहेत, गवती कुरणे आहेत, ..

स्वदेशी आणि परदेशी ...

स्थानिक झाडे  आपल्या देशात परदेशातल्या वस्तू वापरण्याचं एकप्रकारचं वेडच आहे. म्हणजे आपल्याकडची वस्तू कितीही उपयोगी असो, टिकाऊ असो पण त्याकडे डोळसपणाने दुर्लक्ष करून त्यापेक्षा महाग वस्तू वापरण्याकडेच आपला कल असतो. ..