शिक्षक दिन

दिंनाक: 05 Sep 2020 16:10:21


महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये ऑनलाइन शिक्षक दिन खूप उत्साहात साजरा करण्यात आला.
🔹५ पाच सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी
विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष ऑनलाइन पद्धतीने शिक्षक म्हणून अध्यापन केले.
🔹 तसेच शिक्षक दिनाचा ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम देखील घेण्यात आला.
🔹कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता ताई वैद्य यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या *माननीय सौ. ज्योती ताई आफळे यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले व विद्यार्थिनीशी सुसंवाद साधला.
🌸 ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या, त्यांनीही आपले आगळे वेगळे अनुभव व्यक्त केले.
🌸 शिक्षक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.
🌸अशा या तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या कार्यक्रमांचा आनंद सर्व विद्यार्थिनींनी घेतला.