बाई तुम्ही शिकवण दिलीत

आणि पाठराखण केलीत

सांगितले मनापासून काम करायला

आणि शिकवले कामावर प्रेम करायला

संस्कारांची शिदोरी तुमची, आयुष्यभर पुरवते आहे

माझ्या मुलांकरता त्यातले थोडेसे काही पुरवते आहे

तुम्ही दाखवलेली वाट प्रामाणिकपणाची अवघड आहे

डोक्यावरचे ओझे पण संस्कारांनी भरून जड आहे

तरीपण चालते आहे मी तुमची शिकवण स्मरून

किती वेळा मोहाच्या डोंगरांनी दर्शन दिले दुरून

पण चढले नाहीत तो डोंगर मी त्याकडे कानाडोळा केला

पुढे दिसले यशाचे पर्वत आनंद गगनात मावेना झाला

कळले तुमच्या संस्कारांचे महत्त्व ते होते अनमोल

आठवले यशाच्या सर्वोच्च क्षणी मला तुमचेच बोल

बाई, आज आहे मी इथे उभी हे तुमचेच देणे

असु द्या माझ्यावर प्रेम असेच हेच ईश्वरचरणी मागणे

- विदुला अष्टेकर