ओळखा पाहू?

दिंनाक: 24 Jul 2020 16:25:13


लाल चोच, काळे डोके,मानेवर पांढरा पट्टा,अंगावर निळा रंग, पोटाच्या बाजूला पिवळी तपकिरी झाक असा हा आहे खंड्याच! कृष्णशीर खंड्या याचं नाव कारण याचं डोकं काळ्या रंगाचं आहे.३० से.मी. साधारण आकार असलेल्या या पक्ष्याला इंग्रजीत Black-Capped Kingfisher म्हटले जाते.
मासे आणि बेडूक खाणारा पक्षी असल्याने पाण्याच्या परिसरात याची वस्ती असते.खारफुटी प्रदेशातही हा वावरताना दिसतो.

- आर्या जोशी