अतूट नातं

दिंनाक: 14 Jul 2020 12:53:00


मानव आणि पाऊस अतूट यांचं नातं
हिरव्यागार गवताचं असतं जसं नाजूक पातं ॥

पावसाच्या आगमनाने होई तृप्त धरणी
मानवाची पावसासोबत एक जुनी कहाणी ॥
कधी रौद्र, कधी शांत असे याचे स्वरूप
मानवाला मात्र असतो वर्षा सहलीचा हुरूप ॥

नदी, नाले, विहिरी, तलाव तुडूंब भरवितो
हळुवार आठवणींमध्ये चिंब भिजवितो ॥

बरसण्याने त्याच्या दिलासा मिळे सृष्टीला
होणार्या अतिवृष्टीचे भय असे मनाला ॥

पर्जन्य, वर्षा, वरूण अशी विविध नावे त्याची
दर वर्षी असे मानवाला प्रतीक्षा पावसाची ॥

- सायली ठाकुरदेसाई
विद्यामंदीर-मांडा, टिटवाळा