रेसिपी
टुटीफ्रूटी
साहित्य : कलिंगड, साखर दीड वाटी पाणी, सुरी, खायचा रंग.

कृती : कलिंगड कापल्यानंतर जो पांढरा भाग असतो तो सुरीने काढून घ्यावा. नंतर त्या कालिंगडच्या पांढऱ्या भागाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे. हे तुकडे पातेल्यात पाणी घालून दहा मिनिटे पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यावेत.
नंतर हे तुकडे गाळणीतून गाळून घ्यावेत. दीड वाटी साखरेत, साखर भिजेल इतके पाणी घालून पाक बनवा. त्या पाकात हे तुकडे घालून पाक तुकड्यांमध्ये मुरू द्यावा. दोन वेगळ्या बाऊलमध्ये आपल्या आवडीचे रंग घ्या व पाकातले तुकडे त्या रंगात घोळवा. नंतर हे तुकडे उन्हात वाळवा व भरून ठेवा.
खायला तयार आहे टुटीफ्रुटी

- सुजल धारणे
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
पुणे.