१ मे १९६० रोजी 'ज्ञानाय दानायच रक्षणाय', या हेतूने मागेल त्याला शिक्षण हे ध्येयपर ब्रीदवाक्य घेऊन छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेची स्थापना झाली.
      २ मे २०१९ रोजी संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने गदिमा, बाबूजी आणि  पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "त्रिवेणी पर्वणी" संगीताचा कार्यक्रम आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे संपन्न झाला होता.
१ मे २०२० छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे हिरक महोत्सवी सांगता वर्ष! संस्थेला ६० वर्ष पूर्ण होऊन संस्थेने ६१ व्या वर्षात पदार्पण केले.
लॉकडाउनमुळे सर्व जण घरात आहोत. परंतु हे बंध भावनांचे सर्वांच्या मनात रेशमीबंधाने दृढ आहेत. हिरक महोत्सवी सांगतावर्ष कार्यक्रम दृक्श्राव्य माध्यम, तंत्रज्ञानाचा वापर करून करायचा आणि शिक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे या उदात्त संकल्पनेने संस्था चिटणीस भारती वेदपाठक यांनी 'हे बंध भावनांचे' हा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम १ मे रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवरून सर्वाना पाहता आला. या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी धनंजय पाठक, आशुतोष देवधर, डॉ. निलेश रेवगडे यांचाही हातभार होता. संस्था अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी यांच्या प्रोत्साहनाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
संस्थेतील शिक्षकांनी स्वरचित, तसेच प्रख्यात कवींच्या कविता सादर केल्या. विविध भावनांच्या छटा रेशमी बंधात न्हाऊन निघाल्या .सर्वानी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
किशोर लाड, मनोज खंडवी यांनीही तांत्रिक बाजू यशस्वीरीत्या सांभाळली.
पालकर (संस्था सदस्य),
शेडगे, सुरावकर, खांबल, गवस मॅडम, उपासनी मॅडम, इंदोरे मॅडम भोसले मॅडम, सावंत मॅडम सणस मॅडम या शिक्षकांनी कविता वाचन केले.
या लॉकडाऊनच्या काळात या कार्यक्रमामुळे सर्वांचे बंध अधिकच दृढ झाले. तापत्या उन्हात शीतल मृगसरी अंगावर येऊन बेधुंद आनंद घ्यावा तसा निखळ आनंद व संस्थेप्रती कायम ऋणानुबंध रुजू झाले.
संस्थेची यशाची गौरवगाथा अशीच झळकत राहो ही सदिच्छा!


बंध भावनांचे

बंध भावनांचे
व्रत ज्ञानदानाचे
मागेल त्याला शिक्षण
हे ब्रीद ध्येयाचे

संस्था, शिक्षक-विद्यार्थी
व्रत सेवाभाव
माणूस घडविणे
मनी हाच भाव

धरूनी तंत्रज्ञानाची कास
काव्यगुंफण रेशमीबंधातून
विविध भावनांच्या छटा
अभिव्यक्त काव्यमैफिलीतून

सुवर्णक्षण हिरकमहोत्सवाचे
गौरवगाथा अभिमानाची
शुभेच्छा शतकमहोतस्वी
ज्ञानज्योत शिक्षणाची

 

- छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण