मागच्या रविवारची गोष्ट. माझ्या लहान बहिणीचे पोट खूप दुखत होते. रविवार म्हणजे दवाखाना बंद.. मग काय करायचे? आजीने सांगितले कोमट पाण्यात हिंग घालून ते पाणी पी. तसे केल्यावर अर्ध्या तासांतच आराम मिळाला. हीच आमच्या आजीबाईच्या बटव्याची जादू.
अहो! आमच्या शेजारचा राहुल शाळेत खेळताना पडला. हाताला चांगला मुकामार लागला. सगळी मलमं लावून झाली, पण शेवटी आजी म्हणाली आंबेहळद व चंदनाचा लेप लाव आणि काय गंमत एका तासांतच सूज कमी झाली.
माझा भाऊ मैदानावर खेळायला गेला. त्याने आश्चर्याने मधमाशीच्या पोळ्यावर दगड मारला. त्याला मधमाशी चावली. आजीने लगेचच तुळशीची माती आणि तुळशीच्या पानांचा लेप लावला. त्याला थंडावा मिळाला.
आईला भाजी चिरताना हाताला कापले. आजी म्हणाली लगेचच तुरटी लाव आणि काय आश्चर्य तुरटी लावताच रक्त येणं थांबलं.
मसाल्याचे पदार्थ जसे की हळद, तमालपत्र, लवंग, दालचिनी. दगडफूल, जायफळ, वेलदोडा आणि बाळाच्या गुटीचे अनेक घटक, खारीक, बदाम, मुरुडशेंग, हिरडा असे अनेक घटक आपली रोगप्रतिकरक्षमता वाढवतात.
आपण उगाच पाश्चात्यांचे अनुकरण करतो. आज आपल्या आयुर्वेदाचेच सर्व जग गुणगान करत आहे.
कोरोना या महामारीवर अजूनही औषध सापडलेले नाही. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’
कोरोना होऊ नये यासाठी आपले भारतीय उपाय जसे की, गरम पाणी पिणे, आल्याचा काढा पिणे, लसूण खाणे हे उपाय कामी येत आहेत.
असो! खरंच आपण दुसऱ्यांचे अनुकरण न करता आपला आयुर्वेद हा ठेवा जपला पाहजे. आपले आरोग्य जपले पाहिजे.

- सुजल धारणे
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
पुणे.