आजच्या पक्ष्याचं नाव कुठल्यातरी कवितेत तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल!
हा पक्षी शोधा आणि आम्हाला कळवा हं! तुम्हाला याच्याबद्दल काय काय माहिती मिळाली ते!

या पक्ष्याचं नाव आहे 'दयाळ पक्षी!' इंग्रजीत याला 'Oriental Magpie Robin' असं म्हटलं जातं. याचा रंग काळा-पांढरा असतो. हा झाडावर इकडून तिकडे सारख्या उड्या मारत असतो. याचं पोट पांढर्‍या रंगाचं तर छाती आणि पंख गळा गडद काळ्या रंगाचे असतात. बागांमध्ये खेळताना नीट लक्ष दिलंत तर हा तुम्हाला तिथेही भेटू शकेल. हा पाली, सरडे खातो आणि स्थानिक वावरणारे साप-सुरळीसारखे छोटे प्राणीही खातो.
पिलांना जन्म देण्यासाठी झाडावर घरटे बांधून, त्यात अंडी घालतो.

-आर्या जोशी