साधी कोंबडी आपल्याला माहिती आहेच,पण हीसुद्धा तिच्याच कुटुंबातली आहे पण छानशी रंगीत.. ओळखा पाहू...
ही आहे जांभळी पाणकोंबडी. नावातच कळतं की ही पाण्याच्या परिसरात राहते. हिच्या अंगावर सुंदर जांभळे,निळे रंग असून तिच्या डोक्यावर लाल रंग दिसतो.पाय लालसर गुलाबी असतात. चोच छान लाल असते.
Purple Swamphen असं हिचं इंग्रजी नाव.
जमिनीवर खोल भागात ही अंडी घालते. शेतीच्या प्रदेशात वावरते.स्थानिक साप खाते आणि फळंसुद्धा खाते.साधारण ४३-४५से.मी. हिचा आकार असतो.

- आर्या जोशी