शिक्षणविवेकने सांगू का गोष्ट ही व्हिडिओ स्पर्धा खास लॉकडाऊन काळात मुलांसाठी आणि शिक्षक, पालकांसाठीही आयोजित केली आणि एक धमाल उडवून दिली. शिक्षणविवेकच्या सर्वच स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो तसा याही स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
यासाठी काही खास गोष्टी तुम्हाला सांगते. गोष्ट सांगणं ही खरं तर सोपी गोष्ट नाही बरं !
गोष्ट बोलीभाषेत साधेपणाने सांगता यायला हवी. ऐकणाऱ्याच्या नजरेसमोर त्याचे चित्र उभं राहायला हवं. उच्चार, गोष्टीतलं नाट्य, त्यातली वळणं, आवाजातले चढ-उतार हे महत्त्वाचे. पूर्णविरामाच्या जागी थांबायचं, स्वल्पविरामाच्या जागी थोडं थांबायचं, उद्गारवाचक,प्रश्नचिन्ह (थोडक्यात विरामचिन्हे) हे आपल्या आवाजाच्या टोनमधून प्रेक्षकांना समजावून दिले पाहिजेत. प्रत्येक वाक्यातला शेवटचा शब्दही नीट ऐकू यायला हवा. शब्दातला आशय भावपूर्ण रीतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचायला हवा. सांगण्याचा म्हणजेच बोलण्याचा वेगही योग्य असावा. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी एेकणार्‍यांना त्या गोष्टीचा अनुभव घेता यायला हवा. असे सगळे निकष आम्ही लावून या स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत. या वेळी मुद्दामच आम्ही प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढलेले नाहीत कारण या स्पर्धेला आलेला उदंड असा प्रतिसाद!!!
त्यामुळे आम्ही सर्वोत्कृष्ट हा एकच वरील निकष लावून निकाल जाहीर करत आहोत. ज्यांना बक्षीस मिळालं नाहीये त्यांनी आता वर सांगितलेल्या सूचनांचे पालन करून पुन्हा नव्याने गोष्ट सांगण्याचा सराव करावा. सुट्टी तर आहेच. भरपूर पुस्तकं वाचा आणि गोष्टी सांगा आणि त्याचे व्हिडीओ आम्हाला पाठवून द्या.

सांगू का गोष्ट व्हिडीओ स्पर्धा निकाल
सर्व उत्कृष्ट
पूर्व प्राथमिक गट
साईराज आगवणे
अनवी असोदेकर
अवनी गोखले
अन्वीत हर्डीकर
स्वरा सांगळे
अवनीश कुलकर्णी(N.E.M.S.)

वरद घाटे
_________
प्राथमिक गट इयत्ता १ ली ते ४ थी
तनिष्का मोरे बारामती
धनश्री मुळे
नहुष वैद्य मुलुंड
सोहना हिरोली कोल्हापूर
विरजा निलाखे
दिशा सपकाळ
आरोही भामे
अर्णव देशपांडे
अर्णव मुतालिक
सिद्धांत पटवे
निपुण उनकुले
________
माध्यमिक गट इ.५वी ते७वी
अक्षरा दाभाडे
यश शेलार
वरद कुलकर्णी
शंतनू शिंदे
श्रेया पाटील
श्वेता पोरवल
आर्या सांगळे
_________
माध्यमिक गट इयत्ता८वी ते १०वी
आर्य लडकत
शारदा दांडेकर
प्रथमेश भावे
____________
शिक्षक व पालक गट
छाया शिंदे
पूजा अवचट
शिवानी जोशी
विकास जाधव
भाग्यश्री शहा