झिरो शॅडो

दिंनाक: 13 May 2020 13:10:51


 

आपण नेहेमी म्हणतो की मध्यान्ही सूर्य डोक्यावर येतो. पण मंडळी प्रत्यक्षात दररोज सूर्य आपल्याबरोबर डोक्यावर येत नाही, खरा मध्यावर येत नाही. वर्षातील दोनच दिवस सूर्य खरा खरा डोक्यावर येतो. तेही फक्त त्या प्रदेशात जे +२३.५ आणि -२३.५ या अक्षांशांच्या मध्ये असतील तेव्हा.
सूर्य आपल्याबरोबर डोक्यावर आला की काय होते? आपण जिथे उभे असू तिथे आधी आपली सावली दिसत असेल पण सूर्य ज्या वेळी बरोबर डोक्यावर येईल तेव्हा आपली सावली आपल्याच पायाखाली जाईल, दिसेनाशी होईल, त्यालाच zero shadow म्हणतात.
तुम्ही म्हणालं की सूर्य रोज बरोबर डोक्यावर का येत नाही? तर त्याचे कारण असे : आपली पृथ्वी ही कललेली म्हणजे आपल्या पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशात कललेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जेव्हा सूर्याची आयनिक वृत्तावरील स्थिती म्हणजे declination पृथ्वीवरील त्या त्या ठिकाणाच्या अक्षांशाशी मिळते जुळते होते, एक होते, तेव्हा त्या त्या ठिकाणी त्या दिवशी सूर्यबरोबर माथ्यावर येतो. सूर्याची किरणे बरोबर उभ्या रेषेत पडतात एरवी थोडी कललेली असतात. ही ठिकाणे मात्र कर्क वृत्त आणि मकर वृत्ताच्या मधली ठिकाणे म्हणजे +२३.५ आणि -२३.५ या अक्षांशांच्या मध्ये असायला हवीत.

लीना दामले.