सोनू चा खाऊ

दिंनाक: 29 Apr 2020 21:50:48


आज सोनू आलीये आपल्या भेटीला, आईसोबत एक रेसिपी घेऊन. तिच्या आवडीचा ढोकळा शिकवणारे ती आपल्याला. सोनूची आई आणि आजी शिक्षिका त्यामुळे सगळं अगदी नियोजनपूर्वक सुरू आहे. चला तर मग माधुरीताई आणि सृष्टी काय बनवतात ते पाहू.
ढोकळा बनवण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ (यामध्ये आवडीनुसार रवा, तांदूळपीठ पण टाकू शकता) पाच ते सहा तास ताकात भिजत घाला आणि नंतर त्यात आवश्यकतेनुसार मीठ, सोडा, साखर, लिंबुसत्व टाका आणि ढोकळा तयार करण्यासाठी आईच्या मदतीने गॅसवर ठेवा...छान फुगल्यानंतर खाली उतरवा..छोट्याशा कढईत तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची तुकडे, तीळ, कोथिंबीर टाका आणि ढोकळ्यावर टाका...आणि आवडीच्या चटणीसोबत खा...
सोनू तिच्या आवडीचा पदार्थ शिकलीये, आपणही आपल्या आवडीचे पदार्थ या सुट्टीत नक्कीच शिकू या आणि हो! फक्त आपल्याच आवडीचे का बरं? आई-बाबांच्याही आवडीचे शिकू या की आणि खुश करू या त्यांना. किती कष्ट घेतात ते आपल्यासाठी. छान वाटेल त्यांना. मग वाट कशाची बघताय? चला शोधा घरातल्यांच्या आवडीचे पदार्थ आणि लागा कामाला.

- कु सृष्टी गणेश सोनावणे

खोलेश्वर प्राथमिक विद्यालय,अंबाजोगाई जि.बीड.