काय वाचाल
पुस्तकाचे नावः पंचमाता
लेखक : प्रेमानंद वासुदेव मडकईकर
प्रकाशनः श्री विद्या, २५०, शनिवार पेठ, पुणे 30

सीता, कुंती, शंकुतला, शुभद्रांगी आणि जिजामाता यांनी जगाच्या कल्याणासाठी अलौकिक असे सुपुत्र घडवले. एक आदर्श पालक म्हणून मुलांना घडवताना त्यांना आलेले अनुभव त्याग, ज्ञान, समाजभान, धर्माचे अधिष्ठान, मातृहृदय, कणखरपणा, नेतृत्वगुण, स्त्रीमनापेक्षा एक व्यक्ती म्हणून त्यांचे जीवन.. या सर्वांची यथोचित मांडणी यात आहे. हे पुस्तक म्हणजे भावनांचे विरेचन करणारे साधन आहे कारण या पंचमातांची साधना यात वर्णन केली आहे. हास्य, करूणा, रौद्र, साहस,
प्रेरणा, जिद्द, शांत, विस्मय, उत्साह, अदभूत, वीरता यांसारखे अनेक भाव हे पुस्तक वाचताना निर्माण होतात. आई आणि मुल या दोघांच्या जडणघडणीसाठी अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
तेव्हा मित्रांनो, हे पुस्तक मिळवून आई आणि तुम्ही जरूर वाचा आणि आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेकला जरूर कळवा.

 

-सौ वर्षा लक्ष्मणराव मुंडे शिक्षिका 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई

श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय