रानजाई

दिंनाक: 26 Apr 2020 20:40:32


रानजाई
आणि हे तिने करून दाखवलं.

काकू तुम्ही किती छान रमता बागेत. सकाळ संध्याकाळ काही ना काही चालूच असतं...
हो, ना हात चालूच हवा गं नाहीतर डोकं उगाचंच कुठेही भरकटत जाते... त्यापेक्षा हे बरं ना.. असं बोलता बोलता माझी नजर कुंडीकडे गेली... किती खूश झाले मी.. लगेचच मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले..
आज किती छान रानजाई फुलली बागेत... सुगंध तर भारी..
हो खरंच मागच्या अति पावसात बिचारी कोमेजली होती, पण जरा मग तिला थोडा आडोसा केला... जेणेकरून तिला पावसाचा मारा बसणार नाही... बरेच दिवस तिला मी वेगळीच ठेवली... पूर्ण कोमेजत होती.... काही झाले तरी तिला मरू देणार नाही मी पण ठरवलं..
जुलै-ऑगस्ट 2 महिने तिला सुरक्षित ठेवले... त्या काळात सर्व पानं गळून गेली.. फांद्या पण आपोआप वाकल्या... ते मी पाहत होते... पण त्यामध्ये एक फांदी हिरवी होती.. मुळांकडे. म्हणून सर्व फांद्या कापून टाकल्या व तेवढी एकच ठेवली... तिला थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवत गेली.. हळूच एक पानं त्यावर डोकावत असलेलं मला दिसलें...
किती आनंद झाला... पुढे पालवी फुटू लागली... फांद्या वाढू लागल्या... आणि आता तिचा फूल येण्याचा सिजन होता.. मी रोज तिला पाहायची.. कधी कळी येणार.. पुन्हा कधी बहरणार.... माझं हे स्वप्न मला पूर होताना दिसू लागलं.. १५ दिवस झाले तिला कळ्या आल्या छोट्या छोट्या... म्हणून थोड खत घरी तयार केलेले... घालून तिला पोषणद्रव्य मिळाले... आणि आता ती फुलावर आली.....
किती छान नाजूक.. ४ पाकळ्या असलेली माझी रानजाई
आता पुन्हा फुलू लागली...
खरंच तिची काळजी घेतली त्यामुळे तिने ही मला साथ दिली..आणि ती पण सुंदर रूप घेऊन उभी राहिली ...
कसं असतं ना हे निसर्गाचं अगदी आपल्यासारखेच... त्याला.. पण काही तरी रोग होतच असतात. मावा पडला तर ते झाड पूर्णच मरून जातं... काळा व पांढरा मावा तर खूप त्रास देतो.... जसं आता आपल्याला करोना त्रास देत आहे आणि आपण पण लॉकडाऊन झालो आहोत.
पण आज ही फूल बघून मनात आले, अरे ही जगण्यासाठी आपण काय काय केले... तिला पण २ महिने आडोसा करून ठेवले ना.... तिला पण कुठे तरी वाटलंच असेल.... पण तरी ती तग धरून होतीच की कुंडीत...
म्हणून तर आज ती फुलून आली. किती प्रसन्न संध्याकाळ तिने आपल्याला दाखवली..
हीच संध्याकाळ तुमच्या करता घेऊन आले...
बघा तुम्ही पण खूश ना, हसलात का, आहो हसायलाच हवं... व फुलायला पण हवं मनाने... म्हणजेच आनंद मिळणार नक्कीच तुम्हाला...

माझं मन तर भरून गेले तिच्या गंधाने
वेलींवर नाजूक चांदणी
दिसते जशी तारकांची राणी
हिरवा साज, नाजूक बाज
दिसते नवी नवेली खास
सुगंधाने भरली, अंगणात उभी
माझी नाजूक सुंदर रानजाई..

 - करुणा शिंदे