आई

दिंनाक: 25 Apr 2020 22:36:06


आई कशाला उठवतेस लवकर नाही मला शाळा..
डोक्यावर हात फिरवून म्हण ना झोप रे अजून बाळा...।।
मी ही तसा आळशी नाही.. उठेनच लवकर जरा...
दोघे मिळून व्यायाम करू....आवर ना भराभरा...।।
रोज व्यायाम करून मला हेल्दी व्हायचंय खूप... जेवणात आज घेइन मी पण बाबांसारखं सूप..।।
नाश्ता.. स्वयंपाक.. कपडे.. भांडी.. किती गं करतेस काम...बाबा.. नी मी आवरतो मागचं..तू कर बघू आराम...।।
मधल्या खाण्याच्या विचारानी तू नको ना गडबडू... पाहिलंय मी कालच आजीनी केलेत डबाभर लाडू...।।
बास झालं काम आई तू बस गं थोडा वेळ... सगळे मिळून खेळू..बघ मी मांडून ठेवलाय खेळ...।।
थोडे दिवस थांबा हा करोना होइल पसार...
पण त्या मुळे तुमचा वेळ मिळाला हे मी कधीच नाही विसरणार....।।

 

- अदिती साने