या पक्ष्याचे नाव टकाचोर असे आहे.
इंग्रजीत त्याला Rufous Treepie असे म्हणतात.
याचे डोके करड्या रंगाचे असून पाठ तांबूस असते. पंख काळे पांढरे असतात आणि याची शेपटीलांब असते.
आकाराला साधारण ४६-५० से.मी. असतो.
जिथे दिसेल तिथलाच तो निवासी असतो.
या पक्ष्यामधे नर-मादी दोन्ही आढळत असून हा सहसा झाडांच्या फांद्यांवर बागडताना दिसतो. पानगळी जंगलांच्या परिसरात याचा अधिवास असतो.घरटे बांधून अंडी घालतो. पाली,सरडे, फळे हे याचे खाद्य आहे.

 

-आर्या जोशी